सारखी उचकी लागते का? मग करा हे उपाय

सामना ऑनलाईन । मुंबई

उचकी लागणं ही तशी सामान्य गोष्ट आहे. उचकी लागली की आपणं लगेच पाणी पितो आणि उचकी थांबते. पण काहीजणांची उचकी पाणी प्यायल्यानंतरही थांबत नाही. अशावेळी काय करावे हे जाणून घेऊया.

गोड पदार्थ खा
जर उचकीने हैराण झाले असाल तर एक चमचा साखर खा. साखरेचे दाणे अन्ननलिकेला प्रभावित करतात आणि उचकी थांबते. याला वैज्ञानिकदृष्ट्या काहीही आधार नाही. पण आजीच्या बटव्यातलं हे एक गुपित आहे. जर जवळ साखर नसेल तर चॉकलेट किंवा इतर गोड पदार्थ खाल्ला तरी उचकी थांबते.

आंबट पदार्थ
लिंबू किंवा एखादे आंबट लोणचेही चाखल्यास उचकी थांबते. लिंब, कैरी, टॉमेटोच्या फोडी करून खाल्ल्यानेही उचकी थांबते.

पीनट बटर( शेंगदाण्याचे लोणी)
पीनट बटर खाताना दात व जीभेचा वापर होतो. यामुळे श्वसन प्रक्रियेत अडथळा येऊन उचकी थांबते.

मध
एक चमचा मधात थोडे कोमट पाणी टाकून ते प्यावे.

हाताचा अंगठा
जर उचकी थांबवण्यासाठी तुमच्याकडे कुठलीच गोष्ट उपलब्ध नसेल तर एका हातावर दुसऱ्या हाताच्या अंगठयाने जोरात दाबावे. यामुळे थोड्याच वेळात उचकी थांबते.

गाणी ऐका, नाचा
जर तुम्ही प्रवास करत असाल आणि अचानक उचकी लागली. पण जवळ पाणीही नसेल तर सरळ इयरफोन कानात टाका आणि गाणी ऐकायला सुरुवात करा. जमलं तर नाचा. यामुळे उचकीकडे तुमचे दुर्लक्ष होईल व उचकी आपोआपच थांबेल.

श्वसनाचे व्यायाम
ज्यांना सतत उचकीचा त्रास होत असेल त्यांनी नियमित श्वसनाचे व्यायाम करावेत.