सात दिवस आधीच मिळाला होता हायअॅलर्ट, तरी…

2
jem-terrorist-pulwama

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

जम्मू-कश्मीरच्या राष्ट्रीय महामार्गावर अवंतीपुरा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 30 जवान शहीद झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. मात्र अशा प्रकारचा हल्ला होणार असल्याचा अॅलर्ट गुप्तचर संघटनांकडून काही दिवस आधीच देण्यात आला होता, अशी गंभीर बाब समोर येत आहे. अॅलर्ट मिळाल्यानंतर देखील हल्ला रोखता आला नसल्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

हा हल्ला झाल्यानंतर जैश-ए-मोहम्मदकडून एक व्हिडीओ जारी करण्यात आला आहे. पाहा हा व्हिडीओ:

Terror Attack Live Update- दहशतवाद्यांचा उरीहून मोठा हल्ला, 20 जवान शहीद

2016 मध्ये झालेल्या ‘उरी’ हल्ल्यानंतरचा हा सगळ्यात मोठा दहशतवादी हल्ला मानला जात आहे. जैश-ए-मोहम्मद या संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. जैशे-ए-मोहम्मद या संघटनेची एक सभा 5 फेब्रुवारी रोजी पाकिस्तानच्या कराची शहरात झाली होती. या सभेत मौलाना मसूद अजहरचा छोटा भाऊ आणि जैश-ए-मोहम्मदचा मोऱ्हक्या मौलाना अब्दुल रऊफ असगर यांनी हिंदुस्थानातील शहरांना लक्ष्य करून हादरवून सोडू असे जाहीर केले होते. याची माहिती गुप्तचर संघटनांना मिळाल्यानंतर तसे अॅलर्ट देखील सुरक्षा यंत्रणांना देण्यात आले होते, अशी माहिती आता समोर येत आहे. सभेत बोलताना रऊफ असगर याने दिल्ली पुन्हा एकदा हादरली अशी भाषा वापरली होती.

विरोधकांनी केला दहशतवादी हल्ल्याचा निषेध, मोदींना केले लक्ष्य

अॅलर्ट हाती आल्यानंतर देखील असा हल्ला रोखण्यात यश का आले नाही? असा सवाल करण्यात येत आहे.