हायप्रोफाइल पोकर जुगार खेळणाऱयांना दणका

1

सामना प्रतिनिधी । मुंबई

जुहू येथील एका पंचतारांकित हॉटेलात पोकर जुगार खेळणाऱया धनदांडग्यांच्या मुलांना गुन्हे शाखेच्या समाजसेवा शाखेने दणका दिला. पोलिसांनी 54 पोकर जुगार खेळणाऱया तरुणींना ताब्यात घेऊन 63 जुगार खेळणाऱया पुरुषांना अटक केली आहे.

जुहू येथील सी प्रिन्सेस या पंचतारांकित हॉटेलात पोकर जुगार सुरू असल्याची खबर समाजसेवा शाखेला मिळाली होती. त्यानुसार एसीपी माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शुभा राऊळ व पथकाने त्या हॉटेलवर धडक दिली. तेव्हा हायप्रोफाईल तरुण-तरुणी तेथे पोकर जुगार खेळताना सापडले. घटनास्थळावरून पोलिसांनी 35 लाख किमतीचे 1,847 प्लॅस्टिक कॉइन, 3 लाख 8 हजारांची रोकड व जुगार खेळण्यासाठी लागणारे अन्य साहित्य जप्त केले आहे.