जनावर समजून काठीने डिवचले, पण ‘ते’ दृश्य पाहून पायाखालची जमिन सरकली


सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

‘झोपलेल्या वाघाला कधीही डिवचू नये’ ही म्हणून तुम्ही ऐकली असेल, परंतु ही म्हण मेक्सिकोच्या लोकांनी ऐकली आहे की नाही काय माहीत. याला कारणही तसेच असून मेक्सिकोचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

व्हिडीओत सुरुवातीला गुहेमध्ये एखादे जंगली जनावर झोपले आहे असे दिसते. परंतु या जनावराला दोन फिरस्त्यांनी काठीने डिवचल्यानंतर जे समोर आले ते पाहून त्याला डिवचणाऱ्यांच्या पायाखालची जमिन मात्र सरकली. ‘मिरर’ने या दोन फिरस्त्यांच्या भाषांचा अनुवाद केला आहे. यात म्हणतात की, ‘काय माहित हे काय आहे, परंतु अत्यंत रोमांचक आहे, असे वाटतेय कोणतेतरी जंगली जनावर झोपलेले दिसत आहे.’

गुहेत नक्की कोणते जनावर झोपलेले आहे हे पाहण्यासाठी या दोघांनी काठीच्या सहाय्याने त्याला डिवचले. काठीने डिवचल्यानंतर त्यांना जे दिसते ते पाहून ते आश्चर्यचकीत झाले. कारण ते ज्याला जनावर समजत होते ते जनावर नव्हते तर कोळ्यांचे पोळे होते. काठीने त्यांना डिवचता लक्षावधींच्या संख्येने कोळी बाहेर पडले.