हिलरी क्लिंटनना व्हायचंय फेसबुकची सीईओ 

2

सामना ऑनलाईन । न्यूयॉर्क

माहितीचोरीच्या प्रकरणामुळे जगभरच मोठय़ा वादात सापडलेल्या आणि मोठय़ा प्रमाणावरती टीकेचे लक्ष्य ठरलेल्या फेसबुकचा सध्या कठीण काळ चालू आहे असे म्हणायला हरकत नाही. अनेक दिग्गज कंपन्या आणि सेलिब्रिटी सध्या फेसबुकपासून दूर राहण्याचाच प्रयत्न करताना दिसत आहेत. काहींनी तर जाहीरपणे फेसबुकचे खाते बंद करत असल्याचा घोषणादेखील केल्या आहेत. अशा चिंतेच्या काळात चक्क हिलरी क्लिंटन यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना, ‘आपल्याला राजकीय आयुष्य संपवून, फेसबुकचे CEO व्हायला आवडेल’ असे उत्तर देऊन एकच धमाल उडवली आहे.

‘राजकारणापासून लांब जाऊन, एखाद्या कंपनीचे CEO बनण्याचे ठरवल्यास, कुठल्या कंपनीची CEO व्हायला आवडेल?’ असा प्रश्न हिलरी क्लिंटन यांना विचारण्यात आला होता. यावरती थोडादेखील विचार न करता, हिलरी यांनी तत्परतेने फेसबुकच्या नावाला पसंती दिली.