अबुधाबीच्या कोर्टात आता हिंदी भाषेतून कामकाज

5

सामना ऑनलाईन । दुबई

अबुधाबीच्या कोर्टाने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. न्यायालयाने अरबी आणि इंग्रजी भाषेनंतर आता हिंदी भाषेला मान्यता दिली आहे. त्यामुळे न्यायालयाच्या कामकाजात हिंदी भाषेचा वापर करता येणार आहे. न्यायप्रक्रियेच्या कक्षा विस्ताराव्यात, यासाठी कोर्टाने हा निर्णय घेतला आहे.

अबुधाबी न्याय किभागाच्या (एडीजेडी) म्हणण्यानुसार, कामगारांशी संबंधित प्रश्नांवर अरबी आणि इंग्रजीव्यतिरिक्त हिंदी भाषेतही खटले, याचिका, साक्षी व्हाव्यात या हेतूने न्यायालयाच्या कामकाज भाषेचा विस्तार करण्यात आला आहे. याचा मुख्य उद्देश हिंदी भाषिक लोकांना आपल्या न्यायालयीन प्रक्रियेत त्याचे अधिकार आणि कर्तक्ये शिकण्यास मदत होणार आहे.

एडीजेडीचे अप्पर सचिक युसूफ सईद अल अब्री म्हणाले, दाका, न्याय प्रक्रियेत अधिकाधिक सुसंगतपणा येण्यासाठी तसेच तसेच बहुभाषा लागू करण्याच्या उद्देशातून हा निर्णय घेतला आहे.

– अबुधाबीने कोर्टातील तिसरी अधिकृत भाषा म्हणून हिंदी भाषेचा समावेश करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.
– संयुक्त अरब अमीरमधील दोन- तृतीयांश लोकसंख्या ही किदेशी नागरिकांची आहे. हिंदुस्थानींची लोकसंख्या 26 लाख आहे, जी संयुक्त अरबच्या लोकसंख्येच्या
30 टक्के आहे.