श्राद्ध करणे शक्य नसेत तर…

धर्मशास्त्रात असे काही खास नियम नाहीत, पण श्राद्ध केल्यास पितरांच्या आत्म्याला शांती मिळते असं मानलं जातं. धार्मिक विधीनुसार श्राद्ध कर्म करता येणं शक्य नसेल, तरी काही सोपे उपाय करून पितरांना तृप्त करू शकता. पितरांनी स्वतः आपल्या प्रसन्नतेसाठी हे सोपे उपाय सांगितले आहेत.

> श्राद्ध करण्याची इच्छा आहे पण ते करण्यासाठी तेवढे उत्पन्न नाही तरी निराश होऊ नका. पितरांच्या श्राद्ध कर्मासाठी यथाशक्ती ब्राम्हणांना खाद्यसामग्री ज्यामध्ये पीठ, गुळ, साखर, फळ आणि दक्षिणा द्यावी.

> श्राद्ध करण्याची इच्छा असूनही पैशाअभावी ते करू शकत नसाल तर पाण्यामध्ये काळे तीळ टाकून तर्पण करावे. ब्राम्हणाला एक मूठभर काळे तीळ दान केल्यास पितृ प्रसन्न होतात.

> हे उपायही करणे कुणाला शक्य नसेल तर पितरांना स्मरण करुन गाईंना चारा घालावा. बस, त्यानेही पितरांच्या आत्म्याला शांती मिळते.

> तेही शक्य नसेल तर सूर्यदेवासमोर हात जोडून उभे राहा आणि ‘माझी आर्थिक परिस्थिती नसल्याने पितरांचे श्राद्ध करण्यास मी असमर्थ आहे. यामुळे तुम्ही माझ्या पितरांना माझा आदरयुक्त आणि प्रेमयुक्त नमस्कार त्यांच्यापर्यंत पोहोचवावा आणि त्यांना तृप्त करा अशी प्रार्थना करा. या सोप्या उपायांमुळे पूर्वज प्रसन्न होतील.