अभिषेक म्हणजे काय?

>>आनंद पिंपळकर<<

आनंदी वास्तू, वास्तूतज्ञ ज्योतिर्विद

इष्ट देवतेला प्रसन्न करून घेण्यासाठी… त्याला शांतवण्यासाठी अभिषेक केला जातो… का करतात अभिषेक? काय असेल त्यामागचे शास्त्र?

‘अभि’ म्हणजे प्रथम आणि ‘षेक’ म्हणजे सातत्याने पडणारी धार… अशा रितीने अभिषेकाची संकल्पना प्रत्येक देवतेच्या दृष्टीने वेगवेगळी आहे. त्याला जेवढे आध्यात्मिक महत्त्व आहे तेवढेच शास्त्राrयदृष्टय़ाही खूप महत्त्व आहे.

पूर्वीच्या काळी अभिषेक करण्यामागचा हेतू असा होता की, या विविध देवता म्हणजे वातावरणातील एनर्जींना खेचण्याची ताकद होत्या. आपण डिश ऍन्टीनावर जसा रिसिव्हर लावतो तशा या देवता होत्या. तशा पद्धतीने मूर्ती शास्त्रशुद्ध असेल तर ती वातावरणातील कॉस्मिक लहरी स्वतःकडे आकर्षून घेऊ शकते. त्या मूर्तीतून फक्त सकारात्मकताच आपल्याला मिळावी म्हणून त्यावर अभिषेक म्हणून पाण्याची धार धरली जाते.

देवांवर पाण्याचा अभिषेक केल्यानंतर त्यावर पंचामृताचा अभिषेक केला जातो. त्यानंतर पुन्हा त्यावर पाण्याचा अभिषेक करतात. या सगळ्यामुळे खाली जमिनीवर एक प्रकारचे मिश्रण तयार होते. हे मिश्रण जेव्हा आपण पितो तेव्हा ते घटाघटा पित नाही. आपण ते उजव्या हाताची ओंजळ करून त्या ओंजळीत जेवढं मावतं तेवढंच पितो. यामुळे शरीरात स्निग्धता तयार होते. साखर, दही, तूप आणि मधाचे ठरावीक प्रमाण हृदयापर्यंत पोहोचते. हे मिश्रण औषधासारखे कार्य करते.

शास्त्रशुद्धच असावा

आपण मंदिरात जातो. तेथेच दुधाची पिशवी घेतो, दाताने ती उघडतो आणि तेथेच थुंकतो आणि तेथेच अभिषेक करतो. याला खऱ्या अर्थाने अभिषेक म्हणत नाहीत. अभिषेक हा शास्त्रशुद्धच केला पाहिजे. बदाबदा पाणी ओतलं म्हणजेही अभिषेक होत नाही. अभिषेक विशिष्ट पद्धतीत आणि प्रमाणातच करावा असे सांगण्यात आले आहे. हे प्रमाण खूप महत्त्वाचे आहे. शंकराला संततधार अभिषेक सांगितला जातो. गणपतीला आणि देवींना विशिष्ट वेळेतच अभिषेक करायला सांगतात. त्यामुळे शास्त्रकारांनी प्रत्येक देवतेला कधी अभिषेक करायचा ती वेळ ठरवून दिली आहे. त्या विशिष्ट वेळेतच ते शांत होऊ शकतात. अभिषेक विविध पद्धतीने केले जातात. जसं की पाणी, पंचामृत. या पंचामृतामध्ये मध, दूध, तूप, साखर आणि दही यांचा समावेश असतो. मुळात या सगळ्याला शास्त्राrय आधारही आहे. कोणत्याही देवीदेवतेच्या मस्तकावर जेव्हा आपण कोणत्याही मंत्राने अभिषेक करतो त्यावेळी ध्वनीलहरी शास्त्रांचा आपण वापर करतो. हे शास्त्र आणि पाणी यामुळे एक प्रकारचे कंपन तयार होते.