पबमधील शौचालयात हिंदू देवी, देवतांचे फोटो लावल्याने खळबळ

सामना ऑनलाईन । न्यूयॉर्क

अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात एका पबमधील शौचालयात चक्क हिंदू देवी देवतांचे फोटो लावण्यात आल्याची संतापजनक माहिती समोर आली आहे. हिंदु्स्थानी वंशाच्या अंकिता मिश्रा या तरुणीने शौचालयातील हे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले.

हाऊस ऑफ येस पब असे या पबचे नाव आहे. काही दिवसांपूर्वी अंकिता या पबमध्ये गेली होती. त्यावेळी शौचालयात गणपती, सरस्वती, कालीमाता, आणि शंकराचे फोटो बघून तिला धक्काच बसला. तिने लगेच त्याचे फोटो काढले. नंतर तिने पब प्रशासनाला इमेल पाठवला व त्यात हिंदू देवी देवतांचे फोटो शौचालयात लावून तुम्ही हिंदूच्या धार्मिक भावना दुखावल्याचे नमूद केले. त्यानंतर पब प्रशासनाने दिलगिरी व्यक्त करत आपली चूक मान्य केली. नंतर लगेचच त्यांनी हे फोटो हटवले.