राममंदिर झालेच पाहिजे, पण राम राज्यासाठी देखील अध्यादेश काढा!

1
hindu-janjagruti-sabha

सामना प्रतिनिधी । नगर

राम मंदिर झालेच पाहिजे ही सर्व जनतेची मागणी आहे, अध्यादेश काढायचा असेल तर राम राज्यासाठी काढा, अशी मागणी हिंदू जनजागरण समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक सुनील घनवट यांनी आज नगर येथे पत्रकारांशी बोलताना केली.

गोहत्या बंदी कायदा लागू असतानाही सर्रासपणे चालू असलेल्या गोहत्या, लव जिहाद, धर्मांतरित होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. एकीकडे अन्य धर्मियांना अल्पसंख्याकांच्या नावाखाली विविध सुविधा पुरवल्या जातात आणि बहुसंख्य हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या तीर्थयात्रांना जाणाऱ्या भाविकांची रेल्वे तिकिटावर अतिरिक्त अधिभार लावला जातो. ही कोणती धर्मनिरपेक्षता असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. सरकारने राम मंदिरासाठी अध्यादेश आणण्यापेक्षा राम राज्य आणून हिंदू राष्ट्र होण्यासाठी कायदा करावा, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. आज देशामध्ये अनेक मंदिरे असुरक्षित आहेत. त्या मंदिराची जोपासना केली पाहिजे. आज अनेक मंदिरांमध्ये दिवे लागले जात नाहीत. त्यासाठी बघितले पाहिजे यासाठी सर्व हिंदू धर्मियांनी एकत्र येऊन मंदिराची जोपासना केली पाहिजे असेही त्यांनी यावेळी सांगितले. हिंदू जनजागृती समितीच्या वतीने आम्ही आत्तापर्यंत 1000 सभा घेतलेल्या आहेत, हिंदू जनजागृती करण्याचे काम आम्ही करत आहोत, केदारनाथ सारखे लव्ह जिहादला प्रोत्साहन देणार चित्रपट प्रदर्शित होत आहेत. तर दुसरीकडे राज्य शासन शिर्डी संस्थांकडून सिंचन प्रकल्पाच्या कामासाठी पाचशे कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज देण्यात आले आहे. हे असेच चालू राहणार असेल तर हिंदूला त्यांच्या हक्काचे हिंदू राष्ट्र जोरकसपणे मागावी लागेल हे राष्ट्र कसे साकार करायचे हे समजून घेण्यासाठी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने नगर येथे आम्ही आता सभेचे आयोजन केले आहे.

नगर येथे दि. 20 जानेवारी रोजी हिंदुराष्ट्र जागृती सभेचे आयोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी जिल्हा समिती समन्वयक सनातनचे सद्गुरु नंदकुमार जाधव, जिल्हा समिती समन्वयक प्रियंका लोने यावेळी उपस्थित होते.

नगर येथे होणाऱ्या सभेला राष्ट्रीय हिंदू विधीज्ञ परिषदेचे अध्यक्ष वीरेंद्र इचलकरंजीकर सनातन संस्थेचे धर्मप्रसारक नंदकुमार जाधव, हिंदू जनजागरण समितीचे सुनिल घनवट तसेच रणरागिणी शाखेचे रागेश्री देशपांडे आदींच्या उपस्थितीमध्ये या सभेचे आयोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.