नूतन वर्ष तेरा महिन्यांचे!

सामना ऑनलाईन, मुंबई

रविवारी गुढीपाडवा! या नूतन वर्षामध्ये ज्येष्ठ अधिकमास येत असल्याने हे वर्ष १८ मार्च २०१८ पासून शुक्रवार,५ एप्रिल२०१९ पर्यंत असे तेरा महिन्यांचे होणार असल्याचे पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितले. वटपौर्णिमेपासूनचे सर्व सण सुमारे वीस दिवस उशीरा येत आहेत. सुवर्ण खरेदीदारांसाठी या नूतन वर्षांमध्ये ९ आगस्ट, ६ सप्टेंबर आणि ४ ऑक्टोबर असे एकूण तीन गुरुपुष्य योग येणार आहेत.