पंचायत समितीच्या अभियंत्याला लाच घेताना पकडले

bribe-taking
प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधी। हिंगोली

पंचायत समितीच्या कंत्राटी अभियंत्याला लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे. अभिलाष संतकुमार करेवार असे त्याचे नाव आहे. करेवारला एका व्यक्तीकडून तीन हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले.

हिंगोली तालुक्यातील एकाला शासनाच्या योजनेतून घरकुल मंजूर झाले होते. मंजूर झालेल्या या घरकुलाच्या बांधकामाची मोजमाप पुस्तिकेत नोंद घेण्यासाठी हिंगोली पंचायत समितीचे कंत्राटी अभियंता अभिलाश करेवार यांनी तीन हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार एसीबीकडे संबंधित व्यक्तीने केली. या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर मंगळवारी एसीबीच्या पथकाने सापळा लावला. पंचायत समिती परिसरातील एका हॉटेलमध्ये तक्रारदाराकडून 3 हजार रुपये स्वीकारताना करेवार यांना रंगेहाथ पकडल्याचे एसीबीचे पोलिस निरीक्षक नितीन देशमुख यांनी सांगितले.