मुंबई सफारी :- ऐतिहासिक स्मारके

सामना ऑनलाईन । मुंबई

मुंबई म्हणजे स्वप्ननगरी. ही स्वप्ननगरी इतिहास आणि संस्कृतीनेही परिपूर्ण आहे. या स्वप्ननगरीत अशी काही स्मारकेही आहेत ज्यांचे ऐतिहासिक महत्त्व आहे. अशा काही ऐतिहासिक स्मारकांची सहल तुम्ही कुटुंबासह नक्की करु शकता.

‘मुंबईतील निवडक स्मारके’

१)गेटवे ऑफ इंडिया

हिंदुस्थानाच्या भेटीला आलेले इंग्लंडचे राजकुमार प्रिन्स ऑफ वेल्स (नंतरचे पाचवे जॉर्ज) यांच्या स्वागतासाठी ब्रिटीशांच्या काळात हे प्रवेशद्वार उभारण्यात आले होते. गेटवे ऑफ इंडिया हा मुंबईचा प्रारंभ बिंदू म्हणूनही ओळखण्यात येतो. दक्षिण मुंबईत कुलाबा येथे समुद्र किनाऱ्यावर हे प्रवेशद्वार आहे. या प्रवेशद्वारासमोर ताजमहाल हे पंचतारांकीत हॉटेल आहे.

gateway_of_india

२) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस

इ.स. १८८७ मध्ये व्हिक्टोरिया राणीच्या राज्याभिषेकाच्या सुवर्णजयंतीनिमित्त या स्थानकाची निर्मिती करण्यात आली. आधी या स्थानकाचे नाव व्हिक्टोरिया टर्मिनस होते. आता हे स्थानक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या नावाने ओळखले जाते. महाराष्ट्राच्या सात आश्चर्यांपैकी एक अशी या स्थानकाची ओळख आहे.

cst-station-mumbai

३)राजाबाई टॉवर

लंडनमधील बिग बेन टॉवरला नजरेसमोर ठेवून ब्रिटीश अभियंता जॉर्ज गिल्बर्ट स्कॉट यांच्या देखरेखीखाली १८७० मध्ये या टॉवरची निर्मिती करण्यात आली. या टॉवरची उंची २३० फूट इतकी प्रचंड आहे. दक्षिण मुंबईत चर्चगेटजवळ फोर्ट परिसरात हा टॉवर आहे.

rajabai-tower

४)मुंबई उच्च न्यायलय

मुंबई उच्च न्यायालय हे सर्वात जुन्या न्यायालयांपैकी एक आहे. महाराष्ट्र आणि गोवा राज्यांसोबत दीव-दमण तसेच दादरा आणि नगर हवेली हे केंद्रशासित प्रदेश मुंबई उच्च न्यायालाच्या न्यायक्षेत्रात येतात. ही ऐतिहासिक वास्तू असल्यामुळे पर्यटकांचे आकर्षण आहे.

bombay-high-court-1

मुंबई सफारी :- वस्तूसंग्रहालय

५)बृहन्मुंबई महानगरपालिका इमारत

१८९३ साली हिंदुस्थानातील पहिली बृहन्मुंबई महानगर पालिका स्थापन करण्यात आली. हे मुंबईच्या दक्षिण भागात आहे. येथे नेहमीच पर्यटकांची रैलचेल असते.

bmc_headquarters

६) फ्लोरा फाउंटन

आधी फ्लोरा फाउंटन आणि आता हुतात्मा चौक या नावाने हा चौक ओळखला जातो. हा मुंबईच्या फोर्ट विभागातील एक ऐतिहासिक चौक आहे. इ.स. १८६४मध्ये डेव्हिड ससून यांनी त्यांच्या फ्लोरा नावाच्या अल्पवयातच मरण पावलेल्या मुलीचे स्मरणार्थ हे स्मारक उभारले. याच ठिकाणी महाराष्ट्रात मुंबई प्रांताचा समावेश व्हावा यासाठी हौतात्म्य पत्करणाऱ्यांना आदरांजली वाहण्यासाठी एका स्मारकाची निर्मिती करण्यात आली आहे.

flora-foumtain

७)विपश्चना पॅगोडा

मुंबईतील गोराई परिसरात उभारण्यात आलेला जगातील सर्वात मोठा खांबरहित पॅगोडा आहे. बुद्धांच्या स्मृतीचिन्हांची जपणूक करण्यासाठी २०००साली हा पॅगोडा बांधण्यात आला. दगडांनी बनलेला आणि कोणताही आधारस्तंभ नसलेला हा पॅगोडा असून एकावेळी ८ ते १० हजार लोक तेथे बसू शकतात.

pagoda

८)मुंबई विद्यापीठ

मुंबई विद्यापीठ हे भारतातील सर्वात जुन्या तीन विद्यापीठांतील एक आहे. मुंबई विद्यापीठातून विविध ज्ञानशाखांत पदवीपूर्व, पदवीचे, पदविकांचे आणि पदव्युत्तर शिक्षण दिले जाते. सांताक्रूझ व फोर्ट या भागात मुंबईत विद्यापीठाची दोन संकुले आहेत. फोर्टमधील मुख्य इमारत गॉथिक शैलीत बांधलेली आहे.

mumbai-university-d

मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील आपल्या पसंतीच्या स्मारकांची माहिती आम्हाला नक्की कळवा. खाली दिलेल्या प्रतिक्रियेच्या बॉक्समध्ये टाइप करुन ही माहिती तुम्ही आमच्यासोबत शेअर करू शकता.