खोदकाम करताना सापडले ऐतिहासिक कातळ शिल्प

सामना प्रतिनिधी । मालवण

इतिहास हा जितका जमिनीच्या वर असतो त्यापेक्षा जास्त हा जमिनीच्या खाली गाडला गेलेला असतो असे आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. याचाच प्रत्यय मालवण तालुक्यातील आचरा टेंम्बली येथे घराचे खोदकाम करताना आला. याठिकाणी खोदकाम सुरू असताना चौकोनी आकाराचा दगडावर कोरलेले रेखीव शिल्प सापडले.

टेंम्बली येथील कुडोपी गावात घराच्या बांधकामासाठी खोदकाम सुरू असताना ऐतिहासिक कातळ शिल्प सापडले आहे. दोन स्त्रिया हातात फुलं घेऊन शंकराच्या पिंडीजवळ हात जोडून बसल्याचे या शिल्पामध्ये दिसत आहे. हे शिल्प कोणत्या दशकातील आहे याचा तपास केला जाणार आहे.

आचरा टेंम्बली येथे एका घराच्या बांधकामासाठी जागेचे सपाटीकरण करण्याचे काम सुरू आहे. यावेळी खडकाळ भाग खणून माती व दगड बाजूला टाकत असताना अचानक कामगाराना कोरलेले रेखीव शिल्प असणारा दगड आढळून आला. ठेकेदाराने कुतूहलापोटी तो कामगारांच्या मदतीने दगड बाजूला काढून घेतसाफ केला असता त्यावर कोरीव काम केल्याचे दिसून आले. आचरा टेंम्बली येथे शिल्प मिळाल्याचे समजताच ते शिल्प पाहण्यासाठी धाव घेतली.