विमान अपहरणाची गंमत पडली महाग

47

सामना ऑनलाईन,नवी दिल्ली

गंमत म्हणून विमानात अपहरणाचे पत्र ठेवणाऱ्या व्यावसायिकाला ही गंमत खूपच महागात पडली. अहमदाबादच्या विशेष एनआयए कोर्टाने अशा दुसऱ्याच्या जीवाशी खेळणाऱ्या व्यावसायिकाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली असून पाच कोटींचा दंडही ठोठावला आहे. बिरजू किशोर साल्ला असे या व्यावसायिकाचे नाव आहे. बिरजूने 2017 साली जेट एअरवेजच्या मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या विमानात अपहरणाचे पत्र ठेवले होते.

आपली प्रतिक्रिया द्या