हॉकीत हिंदुस्थानचा गोलोत्सव सुरूच, सिंगापूरचाही 16-1 गोलफरकाने धुव्वा 

हिंदुस्थानच्या हॉकी संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेतील आपली दादागिरी सुरूच ठेवली आहे. उझबेकिस्तानचा 16-0 गोलफरकाने धुव्वा उडविणाऱया हिंदुस्थानने मंगळवारी सिंगापूरचाही 16-1 अशा फरकाने दारुण पराभव केला. कर्णधार हरमनप्रीत सिंगने सर्वाधिक 4 गोल केले, तर मनदीप सिंगने गोलची हॅट्ट्रिक केली.
मनदीप सिंगने 13व्या मिनिटाला गोल करीत संघाचे खाते उघडले. त्यानंतर दुसऱया क्वॉर्टरच्या सुरुवातीला 16व्या मिनिटाला ललित कुमारने हिंदुस्थानसाठी दुसरा गोल केला. मग 22व्या मिनिटाला गुजरातने संघासाठी तिसरा गोल केला, तर पुढच्याच मिनिटाला विवेक सागर प्रसादने चौथा गोल करत हिंदुस्थानची आघाडी आणखी वाढवली. त्यानंतर कर्णधार हरमनप्रीत सिंगने पाचवा गोल केला. मनदीप सिंगने 29व्या मिनिटाला आपला दुसरा आणि संघासाठी सहावा गोल केला. हिंदुस्थानने पूर्वार्धातच 6-0 अशी जोरदार मुसंडी मारली होती.
मध्यंतरानंतर 37व्या मिनिटाला मनदीप सिंगने संघासाठी 7वा आणि 38व्या मिनिटाला समशेर सिंगने 8वा गोल केला. त्यानंतर 40व्या मिनिटाला कर्णधार हरमनप्रीत सिंगने पेनल्टी कॉर्नरद्वारे दोन गोल केले. अशाप्रकारे दुसऱया हाफला सुरुवात झाल्यानंतर काही वेळातच भारताने 10-0 अशी भक्कम आघाडी मिळवली. 42व्या मिनिटाला हरमनप्रीत सिंगने आणखी एक पेनल्टी कॉर्नर घेत संघासाठी 11वा गोल केला. तिसऱया क्वॉर्टरच्या अखेरीस हिंदुस्थानकडे 11-0 अशी मोठी आघाडी होती. चौथा क्वॉर्टर सुरू होताच मनदीप सिंगने 50व्या मिनिटाला दोन गोल केले. अभिषेकनेही वाहत्या गंगेत हात धूत मिळालेल्या संधीचा फायदा घेत 51व्या आणि 52व्या मिनिटाला दोन गोल केले. यानंतर 53व्या मिनिटाला सिंगापूरच्या झकी जुल्करनैनने संघासाठी एकमेव गोल केला. वरुण कुमारने 55व्या मिनिटाला सलग दोन गोल करत हिंदुस्थानला 16-1ने आघाडीवर नेले. ही आघाडी टिकवत हिंदुस्थानने आणखी एक मोठा विजय साकारला.
 आशियाई पदक तालिका
देशसुवर्ण रौप्यकास्यएकूण
चीन53291395
कोरिया 14161949
जपान 8201947
उझबेकिस्तान  561122
हाँगकाँग541019
हिंदुस्थान34714
इंडोनेशिया3159
तैपैई2338
थायलंड2057
इराण14510