घर धाड-धाड कोसळले, पण बाप्पामुळे ‘ते’ ५ जण वाचले

सामना प्रतिनिधी । मालवण

कोकणात गेल्या चार ते पाच दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसाचा जोर शनिवारी अचानक वाढला आहे. मुसळधार पावसात मालवण येथील गजानन शंकर सारंग यांच्या घराच्या भिंती रविवारी सकाळी कोसळल्या. गणपती बसवलेली खोली सोडून इतर तीन खोल्या आणि समोरील भाग धाड-धाड कोसळला. मात्र बाप्पाच्या कृपमुळे घरातील एकाही सदस्याला कोणतीही इजा झाली नाही. अजय गजानन सारंग, अर्चना अजित सारंग, अनुजा अजय सारंग, अमित अजित सारंग, आदित्य अजय सारंग अशी या पाच जणांची नावे आहेत.

सारंग यांचे कुटुंब मुंबईहून पाच दिवसाच्या गणपती उत्सवासाठी कोकणात आले आहे. घरातील पाचही सदस्य झोपेत असताना पाण्याने वेढा दिलेल्या घराच्या भिंती कोसळल्या. पाचही माणसे झोपलेली खोली व गणपती बसवलेला भाग सोडुन अन्य तीन खोल्यांच्या भिंती कोसळल्या. घरातील चीज वस्तूंचेही नुकसान झाले. मात्र कोणतीही जीवीत हानी झाली नाही म्हणून सारंग कुटुंबाने बाप्पाचे आभार मानले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या