वाहतूक नियंत्रणासाठी होमगार्डची मदत घेणार

32

सामना ऑनलाईन । मुंबई

मुंबईसारख्या मोठय़ा शहरातील वाहनांची वाढती संख्या व मेट्रोच्या कामांमुळे मुंबईतील वाहतूककोंडी सोडवण्यासाठी ट्रफिक वॉर्डन म्हणून होमगार्डची नियुक्ती करण्याची योजना आखण्यात येत आहे. मुंबईतील वाढत्या वाहतूककोंडीवर मात करण्याच्या संदर्भात गृह (शहरे), राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी मंत्रालयात बैठक आयोजित केली होती. वाहतूक पोलिसांना मदत व्हावी यासाठी ट्रफिक वॉर्डन नेमण्यासंदर्भात ही अध्यक्षतेखाली बैठक झाली.

मुंबईसारख्या मोठय़ा शहरात दिवसेंदिवस वाहतूककोंडी वाढत आहे. वाहतूक नियंत्रण करण्यासाठी पोलिसांची संख्या कमी पडत आहे. त्यामुळे ट्रफिक वॉर्डनची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यातील महानगरपालिकांच्या हद्दीत वाहतूक नियंत्रणासाठी पोलिसांना सहाय्य व्हावे यासाठी ट्रफिक वॉर्डनची नियुक्ती करण्याचा विचार सुरू आहे. ट्रफिक वॉर्डन म्हणून होमगार्डची मदत घेण्याचाही विचार सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या