घरच्या घरी करा सौंदर्योपचार

> मसूर डाळ तुपात घोटून तयार केलेला लेप दुधात मिसळून चेहऱयावर लावा. असे सात दिवस केल्यास चेहरा सुंदर आणि उजळ होतो.

> डाळिंबाची ताजी साल मधाबरोबर वाटा. हा लेप लावल्याने चेहऱयावर असलेले वांगाचे डाग दूर होतात.

> वायवर्णाची साल बकरीच्या दुधात उगाळून चेहऱयाला लेप केल्याने वांग दूर होते.

> रक्तचंदन, मंजिष्ठा, लोध्र, कोष्ठकोळिंजन, प्रियंगु, वडाचे अंकुर आणि मसूर यांचा लेप केल्यास वांग नष्ट होते व चेहरा सतेज होतो.

> लोध्र वनस्पती, धणे, वेखंड यांचा पाणी किंवा दुधासह चेहऱयावर लेप केल्यास तारुण्यपीटिका बऱ्या होतात.

सर्वसाधारण त्वचेसाठी 

> नितळ त्वचेसाठी भरपूर पाणी पिणे अतिशय गरजेचे आहे.

> चेहरा गार पाण्याने अनेकवेळा स्वच्छ धुवावा. यामुळे तेलकटपणा कमी होतो.

> रोज सकाळी तुळशीचा रस व मध यांचे मिश्रण घेणे फायदेशीर ठरते. त्वचा तजेलदार होते.

> ग्लिसरिन, लिंबाचा रस, गुलाबजल घेऊन रात्री चेहऱ्याला लावल्याने चेहरा टवटवीत होतो.

> त्वचेचा पोत टिकवून ठेवण्यासाठी ३-४ थेंब लिंबूरस, चिमूटभर शुद्ध हळद, १ चमचा काकडीचा रस एकत्र करून हे मिश्रण चेहऱयाला लावावे.

> काकडीचा, संत्र्याचा रस, पपईचा, सीताफळाचा गर यापैकी एक चेहऱयाला लावा. त्यामुळे त्वचेचा काळपटपणा कमी होतो. तसेच त्वचा मऊ व्हायलाही हे रस उपयुक्त आहेत.