मधुचंद्र

क्षिती जोगहेमंत ढोमे

मधुचंद्र म्हणजे- मधुचंद्र म्हणजे नवरा-बायकोने एकमेकांना दिलेला वेळ. लग्नाच्या धावपळीनंतर आराम करायला आणि एकमेकांशी बोलायला मिळालेला वेळ.

 प्लॅनिंग कसे केले?- आम्हाला दोघांनाही समुद्रकिनारी जायचे होते आणि निवांत राहायचेही होते. त्यामुळे मलेशियातील लंगकावीला गेलो होतो. एक तर आम्हाला मोठी सुट्टी नव्हती. चार-पाच दिवसांचीच मिळाली होती. ते जवळ होतं आणि फार थंडही नव्हतं. तेवढा वेळही नव्हता. त्यामुळे तेच ठिकाण आम्ही ठरवले.

आवडते ठिकाण?- लंगकावी. जिथे राहत होतो ती वेस्टीनची प्रॉपर्टी होती. समुद्रकिनाऱयाला लागून हॉटेल होते. आम्ही तेथे सात आयलॅण्ड बघून आलो.  तिथे एक ‘प्रेग्नेण्ट वूमन माऊंटन’ होता. त्याचा आकार गरोदर महिलेसारखा होता. तिथला समुद्र, निसर्ग खूप मस्त.

ठिकाणाचे वर्णन खूप शांत, बरीच माकडं होती. मध्येच पाऊस येत होता. वातावरण खूप थंड आणि गरमही नव्हतं. सूर्योदय, सूर्यास्त पण खूप सुंदर होता.

मधुचंद्रासाठी शॉपिंग-काही नाही. मधुचंद्रासाठी अशी काही शॉपिंग केली नाही. लग्न झाल्यावर अगदी मधला एक दिवस सोडला आणि तिसऱया दिवशी गेलो. त्यामुळे असं खास काही शॉपिंग न करता  फक्त प्राथमिक गोष्टी घेतल्या. बाकी तिथे भरपूर शॉपिंग केली.

 काही खास क्षण-अख्ख्या मधुंचंद्राचे क्षणच खास होते. यात माझ्यासाठी खास क्षण म्हणजे स्विमिंग पूलमध्ये हेमंत उतरला. त्याला स्विमिंग पूलमध्ये फार काही उत्साह नव्हता. पण खूप वेळ नाही-नाही म्हणत फायनली तो आला.

 मधुचंद्र हवाच की-हवाच. लग्नाची आपल्याकडे फार दगदग होते. खरं तर एकमेकांना बोलायला वेळ मिळत नाही. आयुष्यभर आपण एकमेकांसोबत राहणार हे मान्य असले तरी त्याची सुरुवात करायला दोघांना एक शांत वेळ लागतो. तो दोन दिवस, चार दिवस, महिनाभर काही असो पण तो पुरतो आणि फार गरजेचा असतो. नवीन सुरुवात करायला.

एकमेकांशी नव्याने ओळख-जास्त चांगली होती. आधीपेक्षा लग्नानंतर हेमंतवरचे प्रेम आणखी वाढले. त्याच्याविषयी माहिती आहे, पण माहिती असणे एक गोष्ट आणि त्याच्यासोबत राहणे ही वेगळी गोष्ट. त्याच्याविषयी जे माहित होतं ते अनुभवता येत होतं. नवरा बायकोचे नाते आमच्यात कधीच नाहीय. आम्ही एकमेकांचे चांगले मित्र आहोत, जे एकत्र राहतो, सगळी कामं एकत्र करतो.

किती दिवस द्यावेत- कितीही दिवस द्यावेत. जेवढी सुट्टी मिळेल तेवढे दिवस द्यावेत. परत येताना आम्हाला अजिबात असे वाटले नाही की आपला हनीमून संपला. आम्हाला रोजच्या जीवनाची सुरुवात करण्याची फार एक्साइटमेण्ट होती.

तिथली आठवण- खरं तर मला उंचीची भीती वाटते. पण तिकडे आम्ही लंगकावीला स्काय ब्रिजवर गेलो होतो. सोबत हेमंत असल्यामुळे मला उंचीची भीती वाटली नाही. खाली जंगल होतं. फार सुंदर होतं. खूप आयलॅण्ड होते. त्यामुळे इथून तिथे तिथून इथे जायला मजा येत होती.

अनोळखी ठिकाण की रोमॅन्टिजम-खरं तर हनिमूनसाठी अनोळखी ठिकाणी जायला नाही आवडणार. हनिमूननंतर आम्ही बऱयाच ठिकाणी फिरलो. आम्ही आताही खूगदा जातो पण हनिमूनच्या वेळात खूप आनंद झाला असता जर हनिमून म्हणून पुण्याला गेले असते. एकमेकांसोबत वेळ घालवायला मिळणे हेच त्यातली महत्त्वाची गोष्ट असते. प्रवासातच वेळ जातो असे नको.

जोडीदाराची खास आठवण? हनिमूनला गेलो तेव्हाच्या शेवटच्या रात्री आम्ही खूप प्लॅनिंग केले होते आणि उपाशीच झोपून गेले. खाण्याचे वगैरे बेत केले होते. खूप वेळ गप्पा मारु. त्यावेळी हेमंत बिचारा मित्रांना फोन करुन गप्पा मारत होता, टिव्ही पहात होता. पण त्याने मला अजिबात उठवले नाही. माझी झोप मोड केली नाही. खूप मजा केली. प्रवासासाठी तो एकदम मस्त पार्टनर आहे. त

एकमेकांसाठी घेतलेली भेटवस्तू ः वाईनचे दोन वूडन ग्लास. जे आमच्याकडे अजूनही आहेत. आमचे ते स्पेशल ग्लास आहेत.

मधुचंद्रानंतरचा संसारातील जोडीदार..उत्तम जोडीदार आहे. मी खूप पुण्य केले असेन की हेमंतसारखा जोडीदार मला मिळाला. तो चांगला नवरा आहे. उत्तम जोडीदार आहे. त्याच्यासोबत राहिल्यावर आनंदच मिळतो. फार सरळ, शांत आहे. तो सांभाळून घेणारा, समजूतदार नवरा आहे.