‘होरा’ चित्रपटाच्या ध्वनिफितीचे प्रकाशन 

सामना ऑनलाईन । मुंबई

रहस्यमय आणि भयपट अशा विषयावर आधारित असलेल्या ‘होरा’ या चित्रपटाच्या ध्वनिफितीचे प्रकाशन नुकतेच करण्यात आले. पुण्याचे लोकप्रिय सामाजिक कार्यकर्ते आणि बिल्डर ‘तारका फाउंडेशन’ चे अध्यक्ष आशीष काँटे यांच्या वाढदिवस निमित्ताने, यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून केंद्रीय मंत्री रामदास आठवले, मोहन जोशी, खासदार अनिल शिरोळे असे अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी अभिनेते अशोक शिंदे म्हणाले, होरा हा स्पॅनिश शब्द आहे. ‘होरा’ म्हणजे ‘वेळ’. एक वाट सरू रात्रीच्या वेळी रस्ता चुकतो आणि एका बंगल्यात मुक्कासाठी जातो आणि तेथे सुरू होतो. रहस्यमय आणि विचित्र सावल्यांचा खेळ. आणि तो वाट  सरू त्या ठिकाणी अडकून पडतो आणि तो अडकतो होराच्या चक्रव्यूहात अशी चित्रपटाची रहस्यमय व थरारक कथा आहे.