भविष्य – रविवार ७ ते शनिवार १३ जानेवारी २०१८

1

>> नीलिमा प्रधान

मेष – प्रतिष्ठा वाढेल
तुमची लोकप्रियता व प्रतिष्ठा सर्वच क्षेत्रात वाढेल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात तुमच्या कार्याचा उदोउदो होऊल. प्रकृतीची वेळच्या वेळी काळजी घ्या. सर्व संकटांवर मात करण्याची शक्ती ग्रह तुम्हाला देणार आहेत. मनोधैर्य शाबूत ठेवा. नोकरीत वरिष्ठ खूश होतील. कुटुंबाच्या संम्मेलनात आप्तेष्ठांच्या भेटी होतील. शुभ दिन – ९, १०.

वृषभ – जिद्द महत्त्वाची ठरेल
या आठवडय़ात अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करा. संघर्ष संपलेला नाही. जिद्द महत्त्वाची ठरेल. राजकीय-सामाजिक कार्यात आरोप येतील. तुम्ही केलेली चूक निदर्शनास येईल. व्यवसायात तडजोडीची भाषा उपयुक्त ठरेल. नाटय़-चित्रपटसृष्टीत घेतलेली मेहनत कदाचित फुकट जाण्याची शक्यता आहे. शुभ दिन – १२, १३.

मिथुन – परदेशात जाण्याचा योग
क्षेत्र कोणतेही असले तरी कोणतेही महत्त्वाचे काम याच आठवडय़ात पूर्ण करा. भेट व चर्चा करण्यात यश मिळेल. परदेशात नोकरीसाठी जाण्याचा योग येईल. राजकीय-सामाजिक क्षेत्रातील निर्णय घ्या. शेअर्समध्ये आर्थिक गुंतवणूक योग्य सल्ल्याने करा. कुटुंबात किरकोळ तणाव होईल. शुभ दिन – ७, ८.

कर्क – अचानक खर्च
राजकीय-सामाजिक क्षेत्रात ताणतणाव झाला तरी त्यावर मार्ग शोधता येईल. वरिष्ठांच्या मर्जीनुसार निर्णय घेण्याची वेळ येईल. अचानक खर्च उद्भवण्याची शक्यता आहे. भागीदाराबरोबर महत्त्वाची चर्चा करून संयमाने समस्येवर उपाय शोधता येईल. कोर्ट-कचेरीच्या मामल्यात गुर्मीत वागून चालणार नाही. शुभ दिन – ८, ९.

सिंह – लोकप्रियता मिळेल
तुम्ही योजलेले कार्य याच आठवडय़ात पूर्ण करा. दर्जेदार लोकांच्या बरोबर महत्त्वपूर्ण चर्चा सफल होईल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात अधिकार प्राप्ती मिळेल. तुमच्या दौऱयात यश व लोकप्रियता मिळेल. व्यवसायात आळस न करता मालाचा पुरवठा करून थकबाकी लवकर वसूल करा. शुभ दिन – ९, १०.

कन्या – आर्थिक लाभ होईल
राजकीय-सामाजिक क्षेत्रात तुमच्या अपेक्षा पूर्ण होण्याची शक्यता वाढेल. तुमचा हेतू समजून घेऊन नंतर त्यावर विचार विनिमय होण्याचे आश्वासन मिळेल. आर्थिक लाभ मिळेल. कुटुंबात वृद्ध व्यक्तीची सेवा करावी लागेल. नोकरीच्या निमित्ताने घरापासून दूर जाण्याची वेळ येऊ शकते. कोर्ट केससंबंधी कामात यश मिळेल. शुभ दिन – १०, ११.

तूळ – व्यवसायात जम बसेल
आठवडय़ाची सुरुवात दगदगीची जाईल. त्यानंतर मात्र तुमची कामे होतील. नोकरीत चांगला बदल करता येईल. कुटुंबातील व्यक्तीची जबाबदारी घ्यावी लागेल. व्यवसायात जम बसेल. प्रवास होईल. राजकीय-सामाजिक क्षेत्रातील महत्त्वाचा निर्णय व कामे लवकरच पूर्ण करण्याची तयारी करा. शुभ दिन – ११, १२.

वृश्चिक – नवा मार्ग शोधा
रेंगाळत राहिलेली कामे वेळच्या वेळी पूर्ण करा. प्रगतीची किंवा समस्येतून बाहेर पडण्याची संधी फार जास्त वेळ नसते. त्यामुळे वेळीच त्याचा फायदा उठवायचा असतो. नव्या विकासासाठी नवा विचार मांडण्याची गरज आहे. आर्थिक लाभ होईल. व्यवसायात नवा फंडा शोधा. शुभ दिन – ७, ८.

धनु – शेअर्समध्ये फायदा
प्रत्येक नवीन वर्षाचे स्वागत करताना आपल्याला नवी दृष्टी ठेवावी लागते तेव्हाच जीवनाच्या रंगभूमीवर आपण चांगले कलाकार म्हणून माणूस नावाची भूमिका साकार करू शकतो. शेअर्समध्ये मोठा फायदा होईल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात चांगल्या योजना बनवा. त्याचा योग्य तो पाठपुरावा करा. व्यवसायाला कलाटणी मिळेल. शुभ दिन – ९, १०.

मकर – प्रलोभन ओळखा
नवीन वर्षाच्या योजनेत तुम्हाला अनेक चांगले उपक्रम तयार करता येतील. उत्साह व आत्मविश्वासाचे जास्त प्रदर्शन न करता समस्येवर लक्ष द्या. राजकीय-सामाजिक क्षेत्रात तत्परता ठेवा. मनोबल टिकून राहील. धंद्यात मात्र उतावळेपणा नको. प्रलोभन ओळखा. निर्णयाची घाई नको. शुभ दिन – १२, १३.

कुंभ – योजना मार्गी लागतील
ठरविलेल्या कार्यक्रमात अचानक अडचणी येण्याची शक्यता आहे. टीकात्मक चर्चा तुमच्या विरोधात होईल. त्यावर जास्त विचार करण्याची आवश्यकता नाही. राजकीय-सामाजिक क्षेत्रात योजना मार्गी लागतील. प्रतिष्ठा मिळेल. संशोधन कार्यात विशेष यश मिळेल. दर्जेदार लोकांच्या सहवासाने विचारांना चालना मिळेल.
शुभ दिन – १०, ११.

मीन – खरेदीची संधी
व्यवसायात मोठे काम मार्गी लागेल. आर्थिक फायदा होईल. याच आठवडय़ात जिद्दीने काम पूर्ण करा. योग्य ठिकाणी पैसा गुंतवा. शेअर्सचा अंदाज बरोबर येईल. गैरसमज व वाद होईल. प्रवासात सावध राहा. कुटुंबातील वाटाघाटीचा प्रश्न सोडवता येईल. घर, जमीन घेण्यासाठी प्रयत्न करता येईल. कागदपत्र नीट वाचून घ्या. शुभ दिन – १२, १३.