भविष्य – रविवार १४ ते शनिवार २० जानेवारी २०१८

3

>> नीलिमा प्रधान

मेष – प्रतिष्ठा वाढेल
राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमच्या योजनांचा गूळ जेवढा मोठा व गोड असेल तेवढे तीळ त्याकडे आकर्षित होतील. प्रतिष्ठा व लोकप्रियता वाढेल. डावपेच नव्या विचारांचे व पद्धतीचे तयार करू शकाल. रेंगाळत राहिलेली कामे होतील. वाटाघाटीसंबंधी चांगला निर्णय घेता येईल. प्रयत्न यशस्वी होतील. शुभ दिनांक – १५, १७

वृषभ – नोकरी मिळेल
मनावर दडपण येईल. स्वतःच्या प्रकृतीची काळजी घ्या. राजकीय, सामाजिक क्षेत्रात संधी मिळेल. कुटुंबातील ताणतणाव समजूतदारपणे सोडवा. व्यवसायात तडजोड करावी लागेल. मोठी गुंतवणूक करण्याची घाई नको. नव्या विचारांचा उपयोग करा. तत्परता व चौकस बुद्धीचा वापर करा. शुभ दिनांक – १७, १८

मिथुन – व्यवसायात संधी
नोकरीत कामाचे दडपण राहील. दगदग होईल. वरिष्ठांच्या मर्जीनुसार निर्णय घ्यावा लागेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात आरोप येण्याची शक्यता आहे. विरोधकांचा तुमच्या संपत्तीवर डोळा राहील. व्यवसायात वाढ करण्याची संधी मिळेल. कौटुंबिक जबाबदारी वाढेल. शुभ दिनांक – १५, २०

कर्क – अडचणी कमी होतील
‘तीळगूळ घ्या गोड बोला’ असे म्हणून तीळगूळ वाटला तरी समोरचा माणूस त्याच्या पद्धतीनेच वागतो. राजकीय, सामाजिक कार्यातील अडचणी कमी होतील. व्यवसायातील समस्या सोडवण्यासाठी कष्ट घ्यावे लागतील. कला, क्रीडा क्षेत्रातील गुंता सोडवता येईल. अपेक्षा पूर्ण होतील. शुभ दिनांक – १७, १८

सिंह – सहनशीलता ठेवा
राजकीय, सामाजिक क्षेत्रात अवघड समस्येचा सामना करावा लागेल. कोणावरही प्रहार करताना लोकमतांचा व लोकप्रियतेचा विचार करावाच लागेल. संयमाने कुटुंबातील प्रश्न सोडवा. नाटय़-चित्रपट क्षेत्रात अडचणी येतील. आपसात मतभेद होतील. प्रवासात घाई नको. धावपळ वाढेल. शुभ दिनांक – १६, २०

कन्या – कामे मार्गी लागतील
आत्मविश्वास वाढेल. एखादे कठीण काम करून दाखवाल. नोकरीत वरिष्ठ खूश होतील. जीवनाला कलाटणी देणारी घटना घडेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील रेंगाळत राहिलेली कामे वेगाने पुढे न्याल. नाटय़-चित्रपट क्षेत्रात उत्साहवर्धक वातावरण राहील. विचारांना चालना मिळेल. शुभ दिनांक – १७, १८

तूळ – दर्जेदार लोकांचा परिचय होईल
कोणतेही काम करताना उतावळेपणा करून चालणार नाही. काम तपासून पाहावे लागेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात दुसऱयावर जास्त अवलंबून न राहता स्वतःलाच लक्ष देण्याची गरज आहे. फसगत टाळता येईल. दर्जेदार लोकांचा परिचय होईल व त्यांची कामे करावी लागतील. शुभ दिनांक – १४, १५

वृश्चिक – गुंतवणूक कराल
तुमच्या विचारांना योग्य दिशा मिळेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात लोक तुम्हाला ओळखता येतील. तुमच्या चुका सुधारता येतील. अधिक चांगल्या प्रकारे कार्य करता येईल. शेअर्सचा अंदाज बरोबर येईल. नवीन गुंतवणूक होऊ शकेल. कोर्ट केसमध्ये आशादायक परिस्थिती राहील. शुभ दिनांक – १४, १७

धनु – दुसऱ्यांची मते ऐका
तुम्ही जबाबदारी घेऊन जे काम करता त्याची जाणीव घर, नोकरी-धंदा सर्वच ठिकाणी होईल. विचारांना चालना देणारी घटना व्यवसायात घडेल. राजकीय क्षेत्रात तुमचा तीळगूळ अधिक प्रभावी ठरेल. तुमच्या कार्यात सफलता मिळवता येईल. नाटय़-चित्रपट क्षेत्रात पुरस्कार मिळेल. सोनेरी स्वप्न पूर्ण होईल. शुभ दिनांक – १८, १९

मकर – सुखद घटना घडेल
आठवडय़ाच्या सुरुवातीला कठीण काम करण्याची घाई करू नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमचे मुद्दे व विचार सर्वांना व्यवस्थित पटवून देता येतील. कुटुंबात सुखद घटना घडेल. तरीही वरिष्ठ व्यक्तींची काळजी घ्यावी लागेल. तिळातिळाने माणसांची प्रगती होत असते. तुम्हाला उन्नतीची संधी मिळेलच. शुभ दिनांक – १९, २०

कुंभ -जबाबदारीने निर्णय घ्या
राजकीय, सामाजिक क्षेत्रात संमिश्र स्वरूपाच्या घटना घडतील. कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करताना काळजी घ्या. महत्त्वाचा निर्णय घेण्याची जबाबदारी तुमच्याकडे देण्यात येईल. कुटुंबात चिंता वाटेल. नातलग, मित्र यांच्यात गैरसमज होऊ शकतो. नाटय़, चित्रपटात तंटा निर्माण करण्याचा प्रयत्न होईल. शुभ दिनांक – १३, २०

मीन – शैक्षणिक क्षेत्रात यश
या आठवडय़ात तुम्ही तत्पर रहा. व्यवसायात मोठी संधी मिळेल. जमिनीच्या व्यवहारात फायदा होईल. शेअर्सचा अंदाज बरोबर येईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा टिकवता येईल.या वर्षाचा तीळगूळ सर्वांनाच द्या. दूरच्या प्रवासाचा बेत ठरवाल. शैक्षणिक क्षेत्रात यश खेचता येईल. शुभ दिनांक – १५, १७