भविष्य – रविवार २८ ते शनिवार ३ फेब्रुवारी २०१८

1

>> नीलिमा प्रधान

मेष – कंत्राट मिळेल
राजकीय-सामाजिक क्षेत्रात तुमच्या कार्याला योग्य दिशा मिळेल. लोकसंघटन व्यापक स्वरूपात वाढवता येईल. मोठे कंत्राट मिळवाल. तुम्ही पूर्वी केलेल्या सत्कृत्याची जाणीव लोकांना करून देता येईल. नवीन योजना त्याचप्रमाणे करण्याचे ठरवता येईल. व्यवसायात मोठी उलाढाल शक्य होईल.
शुभ दिनांक – २८, २९.

वृषभ – व्यवसायाला दिशा मिळेल
या आठवडय़ात सर्व कामे पूर्ण होतील. त्यानुसार योग्य प्रयत्न करा. नोकरीतील समस्या संपवता येतील. व्यवसायाला दिशा मिळेल. आर्थिक उलाढाल सावधपणेच करण्याची आहे. शेअर्सचा अंदाज बरोबर येईल. जास्त मोह व अपेक्षा ठेवू नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील गैरसमज दूर करू शकाल.
शुभ दिनांक – २९, ३०.

मिथुन – आत्मविश्वास वाढेल
तुमचा आत्मविश्वास व उत्साह वाढेल. क्षेत्र कोणतेही असो, योग्य संधी मिळणे कठीण आहे. वेळ, प्रसंग पाहून निर्णय घ्या.राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होईल. व्यवसायात कोणताही करार करताना उतावळेपणा नको. गर्विष्ठपणाने तुमची प्रतिष्ठा धोक्यात येऊ शकते.
शुभ दिनांक – १, २.

कर्क – परदेशात जाण्याची संधी
राग वाढेल. त्यानंतर मात्र तुमच्या आत्मविश्वासात भर पडेल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात महत्त्वाची घटना घडेल. विरोधक मैत्री करण्याची तयारी दर्शवतील. परदेशात जाण्याची संधी मिळेल. दूर गेलेले नेते, कार्यकर्ते पुन्हा तुम्हाला सहाय्य करतील. व्यवसायात सुधारणा होईल.
शुभ दिनांक – १, २.

सिंह – धंद्यात खर्च होईल
राजकीय-सामाजिक क्षेत्रात वेगळय़ाच स्वरूपाच्या घटना घडतील. तुमच्यावर दबाव व ताण असेल. तरीही तुमच्या आजूबाजूच्या वातावरणाचा तुम्हाला कशाप्रकारे उपयोग करून घ्यावयाचा याची योजना या आठवडय़ात करता येईल. धंद्यात खर्च होईल. शेअर्समध्ये उतावळेपणा नको.
शुभ दिनांक – २, ३.

कन्या – उत्साह वाढेल
आठवडय़ाच्या सुरुवातीलाच चांगला निर्णय घेता येईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अधिकार प्राप्ती होऊ शकते. प्रयत्न करा. लोकप्रियता वाढवा. व्यवसायात जम बसेल. परदेशात उद्योग नेता येईल. कायद्याच्या कक्षेत राहून काम करा. उत्साह वाढेल परदेशात जाण्याची संधी कंपनीद्वारे नोकरीत मिळू शकते.
शुभ दिनांक – २८, २९.

तूळ – कोर्ट केसमध्ये दिलासा
जीवन जगण्यासाठी पैशाची अत्यंत गरज असते; परंतु सर्व गोष्टी पैशाने विकत घेता येत नाही. माणसांचे प्रेम व प्रामाणिकपणा हा विकाऊ नसतो. कोर्टकेसमध्ये दिलासा मिळू शकेल. याची जाणीव माणसाने नेहमीच ठेवावी. राजकीय – सामाजिक क्षेत्रात तुम्हाला ठोस निर्णय घेणे अवघड वाटेल.
शुभ दिनांक – १, २.

वृश्चिक – शेअर्सचा अंदाज योग्य ठरेल
आठवडय़ाची सुरुवात कटकटी निर्माण करेल. राग वाढेल. प्रवासात वाहन चालताना किंवा रस्त्याने चालताना सावधगिरी बाळगा. राजकीय-सामाजिक क्षेत्रात अधिक खंबीरपणाने कार्य करा. शेअर्सचा अंदाज बरोबर येईल. लोकांच्या विचारांना जाणून घ्या.म्हणजे योग्यप्रकारे योजनांची आखणी करता येईल.
शुभ दिनांक – १, २.

धनु – वाहन सावकाश चालवा
राजकीय क्षेत्रात तुमचे डावपेच यशस्वी होतील. तुमचा अंदाज बरोबर होईल. वरिष्ठ तुमचे मुद्दे समजून घेतील. सामाजिक कार्याला चांगली कलाटणी मिळेल. दगदग, धावपळ होईल. प्रकृतीची काळजी घ्या.वाहनाचा वेग नियंत्रित ठेवा. कौटुंबिक वाटाघाटीचा प्रश्न लवकर सोडवा. बेकारांना नोकरी मिळेल.
शुभ दिनांक – २, ३.

मकर – कौटुंबिक जबाबदारी वाढेल
राजकीय क्षेत्रात तुमची प्रतिष्ठा वाढेल. सामाजिक कार्यात तुमच्या योजना व कार्य लोकांना आवडेल. विघ्नसंतोषी लोक तुमच्या कार्यात अडचणी निर्माण करतील. तुमच्या मनावर दडपण आणतील. तुम्ही अस्थिर व्हाल. सहकारी व नेते सहाय्य करतील. कौटुंबिक जबाबदारी वाढेल. व्यवसायाला चांगले वळण मिळेल.
शुभ दिनांक ः २८, ३०.

कुंभ – मैत्रीत मतभेद होतील
कुटुंबात मनाविरुद्ध जवळची माणसे वागतील. मैत्रीत मतभेद होतील. राजकीय क्षेत्रात वरिष्ठ तुमचे मुद्दे खोडून काढू शकतात. सामाजिक कार्यात आरोप येण्याची शक्यता आहे. तुमचे विचार इतरांना झटकन पटतीलच असे समजू नका. स्वतःच्या खाण्यापिण्याची काळजी घ्या.कायद्याच्या कक्षा मोडून चालणार नाही.
शुभ दिनांक ः २८, २९.

मीन – मोठय़ा लोकांची ओळख वाढेल
आजचे काम उद्यावर टाकू नका. व्यवसायात चांगला फायदा होईल. राजकीय – सामाजिक क्षेत्रात वरिष्ठांच्ंाा सहवास मिळेल. मोठय़ा लोकांची ओळख वाढेल. तुमच्या कार्यावर लोक खूश होतील. आर्थिक मदत मिळू शकेल. कोर्टकेसमध्ये सावधपणे निर्णय घ्या.चूक होण्याची शक्यता आहे.
शुभ दिनांक – २८, २९.