आठवड्याचे भविष्य

8

समस्या – नोकरीत अचानक काही अडथळे येतात. उगीचच कामावरून काढून टाकले जाते…

तोडगा – दर शनिवारी मारूतीची उपासना करा. देवघरात मारूतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करा आणि त्याला रूईच्या पानांचा हार घाला. याशिवाय नित्य नियमाने मारूती स्तोत्र म्हणा.

मेष – गुलाबी हवा

विवाह एक वरदान आहे. याचा प्रत्यय तुम्हाला या आठवडय़ात येणार आहे. प्रेमाचे वातावरण तुमच्याभोवती राहणार आहे. या आठवडय़ात फुले, हवा, सूर्यप्रकाश, फुलपाखरे यांच्या सहवासात जोडीदारासोबत क्षण व्यतीत कराल. आनंदाचे वातावरण राहील. पिवळा रंग जवळ बाळगा. शुभ आहार …श्रीखंड, पीयूष

वृषभ – वेगळा अनुभव
ध्यानधारणा आणि योग याचा तुम्हाला फायदा होईल. उधार मागणाऱयांकडे पूर्ण दुर्लक्ष करा. घरातील आयुष्य समाधानी आणि मोहक असेल. काम अत्यंत उत्साही असेल. मनाप्रमाणे गोष्टी घडतील. काहीतरी वेगळा अनुभव येईल. तांबडा रंग जवळ बाळगा…शुभ आहार… मोहरीच्या पाल्याची भाजी, भाकरी

मिथुन – चढता आलेख
तुमचे संवादकौशल्य या आठवडय़ात खूप प्रभावी ठरणार आहे. तुमचा दुर्दम्य आत्मविश्वास आणि कामाची सुटसुटीत आखणी यामुळे यशाचा आलेख चढता राहील. जोडीदारासोबत क्षुल्लक वादविवाद होतील. त्याकडे दुर्लक्ष करा. कोणताही चमकदार रंग जवळ बाळगा. शुभ आहार…शेवग्याच्या शेंगा, भात

कर्क – विनोदातून यश

तुमच्यातील विनोदबुद्धी जागरूक ठेवा. त्यामुळे जशास तसे उत्तर देता येईल. विनाकारण होणाऱया शेरेबाजीकडे दुर्लक्ष करा. अनपेक्षित धनलाभ होईल. मित्रमैत्रिणींची साथ लाभेल. त्यातूनच विसावा मिळेल. प्रिय व्यक्तीचा विरह सहन करावा लागेल. भगवा रंग जवळ बाळगा. शुभ आहार…जिलबी, मठ्ठा

सिंह – सोनेरी आठवडा
गृहोपयोगी वस्तूंची खरेदी होईल. तुमच्यावर अत्यंत प्रेम करणारी व्यक्ती भेटेल. आयुष्य सार्थकी लागल्यासारखे वाटेल. एखादा उद्योग सुरू करण्यास योग्य काळ. खूप फायदा होईल. रखडलेले पैसे परत मिळतील. एखादा सोन्याचा दागिना कायम अंगावर ठेवा. सोनेरी रंग महत्त्वाचा..शुभ आहार …पुरणपोळी, आमटी

कन्या – आनंद, शांतता
सहपुटुंब सामाजिक कार्य कराल. आध्यात्मिक साहित्य वाचाल. त्याकडे कल वाढेल. घरात आनंद आणि शांतता नांदेल. प्रियजनांबरोबर वेळ घालवाल. जमिनीत गुंतवणूक करा. फायद्यात राहाल. रोजचे शिवकवच वाचायचा नेम ठेवा. पांढरा रंग जवळ बाळगा. शुभ आहार… सांजोरी, शिरा

तूळ – आशावादी राहा
खर्चावर नियंत्रण मिळवा. कठोर विधाने करण्याचे टाळा. आत्मविश्वासामुळे कामात यश मिळवाल. स्वतःला आशावादी ठेवा. घरात पाहुण्यांची वर्दळ असेल. त्यामुळे गृहिणींना कामाचा ताण जाणवेल. पण तुमच्या सोशिक स्वभावामुळे घरात तुमचे कौतुक होईल. हिरवा रंग महत्त्वाचा. शुभ आहार … हिरवे सफरचंद, सीताफळ

वृश्चिक – आदर आणि कदर
आप्तस्वकीयांमध्ये राहिल्याने तुमची मनःस्थिती सुधारेल. खूप विसाव्याचे क्षण लाभतील. तुम्ही सुदैवी असल्यानेच असे स्वकीय तुम्हाला लाभले आहेत. त्यांचा आदर आणि कदर करा. हिवाळ्यात पौष्टिक पदार्थांचा आस्वाद घ्याल. आकाशी रंग जवळ बाळगा. शुभ आहार…मिश्र भाजी, भाकरी

धनू – सहभोजनाचा आनंद
घरगुती प्रश्न आणि प्रलंबित कामे या आठवडय़ात मार्गी लागतील. विवेकी निर्णय घेण्याची खबरदारी घ्या. मित्र गैरफायदा घेऊ पाहतील. सावध राहा. जोडीदारासोबत सहभोजनाचा आनंद मिळेल. सहनशीलता आणि उत्साह तुम्हाला यशाकडे आणि फायद्याकडे घेऊन जाईल. राखाडी रंग जवळ ठेवा. शुभ आहार…हुरडा, दाण्यांची चटणी

मकर – कुटुंबाचा पाठिंबा
तुम्ही सर्वेच्च स्थानी आहातच. विरोधकांकडे दुर्लक्ष करा. मालमत्ताविषयक कामे होतील. उत्तमपैकी नफा होईल. रक्तदाब वाढणार नाही याकडे लक्ष द्या. या आठवडय़ात तुम्ही कुटुंबाच्या घट्ट पाठिंब्याने सुखावाल. वैवाहिक जीवन खूप सुखाचे असेल. टोमॅटोचा रंग जवळ बाळगा. शुभ आहार..टोमॅटोची चटणी, सूप

कुंभ – स्वप्ने सत्यात येतील
कुटुंबातील ज्येष्ठ सदस्याच्या तब्येतीची काळजी घ्या. त्यांच्यासाठी वेळ काढा. जुनी येणी येतील. त्यामुळे हाताशी अतिरिक्त पैसे राहतील. खूप मोठी स्वप्ने पाहाल. ती सत्यातही उतरतील. सर्वत्र कौतुक होईल. पत्नीचा प्रेमवर्षाव अविरत सुरूच राहील. पिवळा रंग जवळ बाळगा.शुभ आहार … सुके मासे, नाचणीची भाकरी

मीन – सर्वत्र कौतुक
आपले काम आणि छंद यात स्वतःला झोपून द्या. नावीन्यपूर्ण कल्पना सुचतील. त्याचा फायदा कामात होईल. सर्वत्र कौतुक होईल. या आठवडय़ात मेहनतीचे फळ मिळेल. चिंता करणे सोडून द्या. तरच आयुष्यात चांगले आणि मनासारखे घडेल. जांभळा रंग जवळ बाळगा. शुभ आहार…ऋतूनुसार फळे