भविष्य – रविवार ५ ते शनिवार ११ नोव्हेंबर २०१७

  • नीलिमा प्रधान

मेष : यशाचा रथ चौफेर धावेल

क्षेत्र कोणतेही असो तुमचा यशाचा रथ चौफेर धावणार आहे. त्यानुसार तुम्ही प्रयत्न चालू ठेवा, संधी मिळेल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात डावपेच यशस्वी होतील. नव्या योजना लवकर सुरू करा. लोकप्रियता मिळेल. दर्जेदार लोकांचा परिचय होईल. चर्चा सफल होईल. तुमच्या कर्तृत्वाची छाप पडेल. शुभ दिन – ५, ७

वृषभ : शेअर्समध्ये फायदा होईल

बुद्धिचातुर्य, तुमची जिद्द व बोलण्यातील गोडवा हीच तुमच्या यशाची प्यादी असतील. नम्रता ठेवा. आर्थिक व्यवहाराची गुंतवणूक करण्याची घाई करू नका. शेअर्समध्ये फायदा होईल. तडजोड करावी लागेल. नाट्य-चित्रपटांत मेहनतीनेच यश खेचावे लागेल. कामावर व व्यवसायात लक्ष केंद्रित करा. शुभ दिन- ७, ८

मिथुन : प्रगतीची मोठी संधी

राजकीय-सामाजिक क्षेत्रात तुमच्या कार्याचा ठसा उमटेल. योजना मार्गी लावण्यात यश मिळेल. व्यवसायात फार मोठी उलाढाल करता येईल. थोरा-मोठ्यांचे सहकार्य मिळेल. प्रवासाचा आनंद घेता येईल. नोकरीत तुमच्या मर्जीनुसार निर्णय होईल. नाट्य-चित्रपटांत गौरवास्पद कार्य होईल. प्रगतीची संधी मिळेल. शुभ दिन – ८, ९

कर्क :नवी खरेदी होईल

प्रगतीचा नवा मार्ग मिळाल्यामुळे तुमचा उत्साह वाढेल. दर्जेदार लोकांचा परिचय होईल. विचारांची देवाणघेवाण होऊन व्यवसायाला नवे स्वरूप देण्यात यश मिळेल. कला-क्रीडा क्षेत्रांत आत्मविश्वासाने पुढे जाल. कुटुंबात शुभ समाचार मिळेल. घर, वाहन, मौल्यवान वस्तू खरेदी कराल. शुभ दिन – ५, ६

सिंह : कोर्ट केस संपवता येईल

राजकीय-सामाजिक क्षेत्रात गुप्त कारवाया गुरुवारी वाढतील. तुमची प्रतिष्ठा व लोकप्रियता यावर त्याचा फारसा परिणाम होणार नाही. व्यवसायात खर्च वाढेल. कला-क्रीडा क्षेत्रात मोलाची कामगिरी कराल. व्यवसायाला चालना मिळेल. कोर्ट केस संपवता येईल. व्यावसायिक गाठभेट होईल. शुभ दिन – ६, ७

कन्या : शिक्षणात चमकाल

स्पष्ट बोलणे योग्य असले तरी प्रत्येक वेळी त्याचा चांगला परिणाम होतोच असे नाही. राजकीय-सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा राहील. पदाधिकार मिळेल. वाटाघाटीची समस्या सोडवता येईल. कला क्षेत्रात विशेष उन्नती मिळू शकेल. नोकरीत चांगला बदल करण्याची संधी मिळेल. शिक्षणात चमकाल. शुभ दिन – ७, ८

तूळ : वादविवाद उद्भवतील

भावनेच्या भरात तुमच्या मनातील सुख वा दुःख व्यक्त करताना काळजी घ्या. वाद व तणाव होण्याची शक्यता आहे. व्यवसायाला योग्य वळण देऊ शकाल. अविवाहितांना लग्नासाठी स्थळे मिळतील. तुमचे मुद्दे प्रभावी व आकर्षक ठरतील. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. परंतु फार मोठे धाडस करू नका. शुभ दिन – ७, ८

वृश्चिक : व्यवसायात सावध राहा

क्षेत्र कोणतेही असो तुम्हाला संघर्षाने, जिद्दीनेच यश मिळवावे लागेल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात तुमचे वर्चस्व डळमळीत करण्याचा प्रयत्न विरोधक, जवळचे सहकारी करतील. व्यवसायात सावध भूमिका घ्या. नुकसान टाळण्याचा प्रयत्न करा. कोर्ट केसमध्ये मनोबल खचवले जाईल. शुभ दिन – ९, १०

धनु : आर्थिक लाभ होईल

प्रगतीचा मार्ग खुला राहील. गुप्तशत्रूंना कमी समजू नका. महत्त्वाच्या गोष्टी शिकण्यास मिळतील. या आठवड्यात संधी मिळेल. परंतु स्वतःचे प्रयत्न महत्त्वाचे असतील. विरोध होईल, अडचणी येतील, त्यातूनच यश मिळवा. व्यवसायात मोठे कंत्राट मिळेल. कलाक्षेत्रात पुरस्कार मिळेल. शुभ दिन – ७, ८

मकर : नाट्य-चित्रपट क्षेत्रात चमकाल

लोकप्रियता वाढेल. योजना यशस्वी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न चालू ठेवा. राजकीय-सामाजिक क्षेत्रात तत्परता दाखवा. ‘करून दाखवा’ म्हणजे विश्वास संपादन करण्यास सुलभ होईल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. नोकरीत प्रगतीची संधी मिळेल. नाट्य-चित्रपट क्षेत्रात चमकाल. नवे परिचय विशेष ठरतील. शुभ दिन – ९, १०

कुंभ : परदेशी जाण्याचा योग

तुमचे परखड परंतु परिस्थितीला धरून केलेले भाष्य कौतुकास्पद ठरेल. व्यक्तींचा तुम्ही केलेला अभ्यास व विचारांची ठेवण हे फार वर्चस्व सिद्ध करणारे असेल. कुटुंबासाठी योग्य निर्णय घ्याल. व्यवसायात वाढ करता येईल. कलाक्षेत्रात आव्हानात्मक कार्य होईल. परदेशात जाण्याचा योग येईल. शुभ दिन – ७, ८

मीन : दूरदृष्टिकोन ठेवा

दूरदृष्टिकोनातून विचार करा व त्यानुसार कार्य करा. प्रत्येक वेळी फायदा न बघता तुमच्या कार्याची व व्यक्तिमत्त्वाची व्यापकता वाढवणे गरजेचे असते. व्यवसायात संधी मिळाली तरी अडचणींवर मात करावीच लागेल. जास्त धाडस नको. नोकरीत प्रयत्नात कसूर नको. अनधिकृत कृत्ये टाळा. शुभ दिन – ६, ७