भविष्य – रविवार २१ ते शनिवार २७ जानेवारी २०१८

121

>> नीलिमा प्रधान

मेष – प्रगतीची संधी
तुम्हाला मिळालेली प्रगतीची प्रत्येक संधी तुमच्यासाठी मोलाची ठरेल. प्रवासात सावध राहा. प्रकृतीची काळजी घ्या. व्यवसायात मोठय़ा प्रमाणात उलाढाल होईल. शेअर्समध्ये फायदा होईल. दर्जेदार लोकांच्या बरोबर चर्चा सफल होईल. नाटय़-चित्रपट क्षेत्रात नावलौकिकात भर पडेल. शुभ दिनांक – २१, २४.

वृषभ – परदेशी जाण्याचा योग
नोकरीचा प्रश्न मार्गी लागेल. परदेशात जाण्यासाठी कायदेशीर परवानगी मिळू शकेल. राजकीय-सामाजिक क्षेत्रातील ताणतणाव कमी करू शकाल. गैरसमज दूर करता येईल. धंद्यात सावधपणे व्यवहार करा. कोर्टकेसमध्ये आशादायक परिस्थिती निर्माण होईल. कौटुंबिक हेवेदावे कमी होतील. शुभ दिनांक – २२, २३.

मिथुन – तडजोड करा
राजकीय-सामाजिक क्षेत्रात बुद्धिचातुर्याने समस्या सोडवा. मार्ग शोधता येईल. वरिष्ठांच्या मर्जीनुसार मनाविरुद्ध काही निर्णय घेण्याची वेळ येईल. मुद्देसूदच बोला. तडजोड करा. नाटय़-चित्रपट, क्रीडा क्षेत्रात जवळच्याच व्यक्तींची नाराजी होऊ शकते. शुभ दिनांक – २१, २२.

कर्क – प्रतिष्ठा वाढेल
अडचणीत आलेली कामे पूर्ण करता येतील. प्रत्येक दिवस प्रगतीच्या दिशेने नेणारा ठरेल. फक्त तोंडात तिळगूळ ठेवा. सामाजिक क्षेत्रात तुमची प्रतिष्ठा वाढेल. योजना पूर्णत्वास नेता येतील असाच प्रयत्न करा. कुटुंबातील नाराजी दूर होईल. शुभ समाचार मिळेल. दर्जेदार व्यक्तींचा परिचय कला-क्रीडा क्षेत्रात होईल. शुभ दिनांक – २३, २४.

सिंह – व्यवसायात तत्परता दाखवा
एखाद्या व्यक्तीने तुम्हाला दिलेले आश्वासन पूर्ण होणे कठीण आहे. राजकीय-सामाजिक क्षेत्रात तुमचे कार्य, तुमचे डावपेच अयशस्वी ठरविण्याचा प्रयत्न गुप्तशत्रू करतील. व्यवसायात तत्परता दाखवा. कुणालाही कमी लेखू नका. जवळच्याच व्यक्ती दगा देण्याची शक्यता आहे. शुभ दिनांक – २१, २६.

कन्या – शुभ घटना घडेल
कार्यातील अडचणी कमी होऊन योग्य मार्गदर्शन करणारी व्यक्ती मिळेल. त्याचा लाभ घ्या. जेवढी मेहनत जास्त घ्याल तेवढे यश तुम्हाला तुमच्या क्षेत्रात मिळेल. कुटुंबात शुभ घटना घडेल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात चुका सुधारता येतील. नव्या पद्धतीच्या विचारसरणीनुसार योजना बनवा. शुभ दिनांक – २६, २७.

तूळ – संयम ठेवा
स्पर्धा करणारे लोक तुमच्या विरोधात कारस्थान करतील. संयमाने तुम्ही मार्ग काढू शकाल. वडय़ाचे तेल वांग्यावर काढू नका. व्यवसायात चौफेर सावध राहा. थकबाकी वसूल करा. कुटुंबात धावपळ वाढेल. जीवनसाथीच्या मर्जीनुसार निर्णय घ्यावा लागेल. डोळय़ांची काळजी घ्या. शुभ दिनांक – २१, २४.

वृश्चिक – शेअर्समध्ये गुंतवणूक करा
कठीण प्रसंगाला आत्मविश्वासाने टक्कर देताना ज्यांनी सहाय्य केले त्यासाठी तुम्ही लोकांचे देणे लागता. हे राजकीय-सामाजिक क्षेत्रात विसरून चालणार नाही. योग्य सल्ल्याने शेअर्समध्ये गुंतवणूक करा. विरोधक चालबाजी करून तुमच्या कार्यात विघ्न आणण्याचा प्रयत्न करतील. शुभ दिनांक – २२, २७.

धनु – नोकरीत बढती मिळेल
राजकीय-सामाजिक क्षेत्रात तुमचे वर्चस्व सिद्ध करण्याची मोठी संधी तुम्हाला मिळेल. त्याचा पुरेपूर फायदा उठवा. व्यवसायाला कलाटणी मिळेल. मोठय़ा लोकांचे सहकार्य मिळेल. प्रतिष्ठत लोकांचा सहवास मिळेल. विचारांना चालना मिळेल. कोर्टकेस संपवण्याचा प्रयत्न करा. नोकरीत बढती व बदल करण्याचा प्रयत्न करा. शुभ दिनांक – २४, २५.

मकर – ताणतणाव दूर होतील
राजकीय-सामाजिक क्षेत्रातील ताणतणाव दूर होतील. नव्या पद्धतीने डावपेच टाकता येतील. लोकांचे सहकार्य व प्रेम मिळेल. आत्मविश्वास वाढेल. प्रत्येक दिवस प्रगतीच्या दिशेने वाटचाल करील. धंद्यात मात्र सावध राहा. आठवडय़ाच्या शेवटी शुभ समाचार मिळेल. कोर्टकेसमध्ये तुमचा मुद्दा प्रशंसनीय ठरू शकतो. शुभ दिनांक – २१, २७.

कुंभ – खर्च वाढेल
राजकीय-सामाजिक क्षेत्रात तुमच्या प्रतिष्ठsला शोभेल असेच वक्तव्य करा. लोकप्रियता कमी होईल असा निर्णय घेऊ नका. व्यवसायासाठी गुंतवणूक करण्याची घाई नको. खर्च वाढेल. कुटुंबात वृद्ध व्यक्तीची चिंता वाटेल. धावपळ होईल. आपसातील माणसांच्या गैरसमज नाटय़-चित्रपट क्षेत्रात होऊ शकतो. शुभ दिनांक – २१, २२.

मीन – योग्य ठिकाणी पैसा गुंतवा
राजकीय-सामाजिक क्षेत्रातील कोणतेही महत्त्वाचे काम याच आठवडय़ात करून घ्या. सामाजिक क्षेत्रातील मोठय़ा लोकांची भेट घेऊन आर्थिक मदत मिळवता येईल. नवीन वास्तू, वाहन खरेदीचा विचार कराल. योग्य ठिकाणीच पैसे गुंतवा. व्यवसायात फायदा होईल. शेअर्सचा अंदाज बरोबर येईल. शुभ दिनांक – २६, २७.

आपली प्रतिक्रिया द्या