भविष्य – ४ फेब्रुवारी ते १० फेब्रुवारी २०१८

1

>> नीलिमा प्रधान

मेष – व्यवसायात जम बसेल
राजकीय क्षेत्रात तुम्हाला नियोजनबद्ध कार्य करावयाचे आहे. विघ्नसंतोषी लोक अडचणी व वाद निर्माण करतील. आत्मविश्वास व लोकांचे सहकार्य तुम्हाला मिळेल. समाजकार्यात प्रतिष्ठा कायम ठेवता येईल. व्यवसायात जम बसेल. नोकरीत ताणतणाव वाढू देऊ नका. प्रवासात सावध राहून प्रकृतीची काळजी घ्या. शुभ दिनांक – ६, ७

वृषभ – जिद्द ठेवा
तुमच्या क्षेत्रात प्रयत्नपूर्वक यश मिळू शकेल. राजकीय क्षेत्रात वरिष्ठांच्या सल्ल्यानुसार कार्य केल्यास तुमचे महत्त्व टिकून राहील. समाजकार्यात महिला, मुले यांच्या समस्येवर अधिक लक्ष द्या. कायद्याचे पालन करा. व्यवसायात जम बसवण्यात यश मिळेल. जिद्द ठेवा. नोकरीत तुमचे संयमी वागणे फलदायी ठरेल. शुभ दिनांक – ५ ,९

मिथुन – सामाजिक कार्य करा
आठवडय़ाच्या सुरुवातीला राजकीय क्षेत्रातील वातावरणाचा योग्य तो अनुभव येऊ शकतो. कुठेही अहंकार व अभिमान याचा वापर टाळा. सामाजिक कार्यात मेहनत घ्या. लोकांचे मन जिंकणे प्रत्येकवेळी जमणे कठीण असते. बुद्धीचा वापर त्यासाठी करा. नोकरीत वरिष्ठांच्या समवेत राहून काम करावे लागेल. शुभ दिनांक – ६, ७

कर्क – कंत्राट मिळेल
कला क्षेत्रातील महत्त्वाचा निर्णय आठवडय़ाच्या सुरुवातीला घ्या. राजकीय क्षेत्रात योजनांना पूर्ण करण्याची जिद्द ठेवा. उत्साह कायम ठेवता येईल. सामाजिक कार्याचा विस्तार करण्यासाठी योग्य ते प्रतिनिधी लवकरच तयार करा. व्यवसायातील थकबाकी वसूल करा व मोठे कंत्राट मिळवा. कोर्ट केसमध्ये यश मिळेल. शुभ दिनांक – ४, ५

सिंह – वाहन सावकाश चालवा
दूरदृष्टिकोनातून राजकीय क्षेत्रात निर्णय घ्या. विरोधकांचा अभ्यास नीट करा. या आठवडय़ात गुप्त कारवायांचा त्रास होईल. दूर गेले ते लोक पुन्हा परत येण्याची शक्यता आहे. वाहनाचा वेग नियंत्रित ठेवा. सामाजिक कार्यात प्रतिष्ठsच्या मागे न लागता स्वच्छ असे कार्य करा. तुमचा प्रभाव पुढील आठवडय़ात वाढेल. शुभ दिनांक – ५, ६.

कन्या – योग्य ठिकाणी पैसे गुंतवा
व्यवसायात महत्त्वाचा बदल या आठवडय़ात करून घ्या. शेअर्सचा अंदाज बरोबर येईल. योग्य सल्ल्याने पैशांची गुंतवणूक करा. राजकीय क्षेत्रात अधिकार आताच मिळू शकतो. सामाजिक कार्यात प्रतिमा उजाळेल. अधिक मदत घेऊन तुमच्या कार्याचा अधिक प्रमाणात विस्तार करू शकाल, फक्त कायदेशीर वागा. शुभ दिनांक – ४, ९

तूळ
प्रगती होईल
आठवडय़ाच्या सुरुवातीला राजकीय क्षेत्रात दगदग व धावपळ जास्त होईल. वरिष्ठ तुमच्यावर मोठी कामगिरी सोपवतील. सामाजिक कार्यात दडपण येईल. दबाव राहींल. व्यवसायाला कलाटणी मिळेल. मनातील संभ्रम दूर करू शकाल. नाटय़, चित्रपटसृष्टीत प्रगतीची संधी मिळू शकेल. प्रयत्न करा. एकाग्रता वाढवा. शुभ दिनांक – ९, १०

वृश्चिक – सहकार्य लाभेल
राजकीय क्षेत्रात तत्परता ठेवा. महत्त्वाची चर्चा लवकर करून घ्या. पुढे संघर्ष वाढेल. सामाजिक कार्यात मतभेद होतील. जास्त विश्वास टाकू नका. कुटुंबातील व्यक्तींचे सहकार्य लाभेल. नवीन बदल करण्याची संधी मिळेल. कोर्ट केसमध्ये याच आठवडय़ात तुमच्या फायद्याचा विजय होऊ शकतो. शुभ दिनांक – ४, ५

धनु – आर्थिक लाभ होईल
आठवडय़ाच्या सुरुवातीला तुमच्या क्षेत्रातील कामे त्वरित होतील. राजकीय क्षेत्रात वर्चस्व सिद्ध करण्याची चांगली संधी मिळेल. नाटय़, चित्रपटसृष्टीत नावलौकिक व आर्थिक लाभ मिळेल. लोकांच्या उपयोगी येतील अशा योजना मार्गी लावता येतील. प्रवासात सावध रहा. वाहन जपून चालवा. दुखापत संभवते. शुभ दिनांक – ६, ७

मकर – जुन्या मित्रांची भेट होईल
इतरांनी केलेल्या चुका सुधारता येतील. राजकीय क्षेत्रात प्रमाणाबाहेर उत्साह व आत्मविश्वास ठेवणे योग्य ठरणार नाही. सामाजिक कार्यात लोकांचे प्रेम मिळेल. विचारपूर्वक कामांची आखणी करा. दूर गेलेले जुने मित्र भेटतील. वेगाने कामास लागा. व्यवसायातील गुंता सुटेल. साडेसाती सुरू असल्याने कायदा व सुव्यवस्थेचे भान ठेवा. शुभ दिनांक – ७, ९

कुंभ – संयम ठेवा
तुमचे विचार खोडून काढण्याचा प्रयत्न होईल. धावपळ सत्कारणी लागेलच असे नाही. राजकीय क्षेत्रात तुमच्यावर दबाव राहील. मोठी कामगिरी पार पाडताना संयम व बुद्धिचातुर्य वापरा. स्पष्टवक्तेपणाचा वापर प्रसंगानुरूप करा. तुमचे हितसंबंध जपा. दुसऱयाच्या सांगण्यावरून तुम्ही कोणतेही मत तयार करू नका. शुभ दिनांक – ९, १०

मीन – महत्त्वाची कामे मार्गी लागतील
क्षेत्र कोणतेही असो महत्त्वाची कामे याच आठवडय़ात करा. राजकीय क्षेत्रात चर्चा करा, वरिष्ठांच्या बरोबर सल्लामसलत करा. नंतर अडचणी वाढतील. सामाजिक कार्यात गैरसमज व नाराजी होईल. घरगुती समस्या सुटतील. आप्तेष्टांच्या भेटीमुळे विचारांना चालना मिळेल. शुभ दिनांक – ४, ५