भविष्य – रविवार ४ ते शनिवार १० मार्च २०१८

32

>> नीलिमा प्रधान

मेष – प्रकृतीची काळजी घ्या
मेषेच्या भाग्यात मंगळाचे राश्यांतर व सूर्य-नेपच्यून युती होत आहे. राजकीय क्षेत्रात तुमचे वर्चस्व वाढेल. टीका होईल, पण तुमचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न अयशस्वीच ठरेल. सामाजिक कार्यात तुमच्या आधाराची गरज सर्वांनाच वाटेल धावपळ होईल. प्रकृतीची व्यवस्थित काळजी घ्या. शुभ दि. – ५,६.

वृषभ – प्रतिष्ठा जपता येईल
वृषभेच्या अष्टमेषात मंगळ प्रवेश व बुध-शुक्र युती होत आहे. कौटुंबिक समस्या वाढण्याची शक्यता आहे. तुमचा संयम ढळू शकतो. स्वतःची बाजू व्यवस्थितपणे मांडण्याचा प्रयत्न करा. राजकीय क्षेत्रात मतभेद होतील. मात्र प्रतिष्ठा जपता येईल. कोर्टाच्या कामात हलगर्जीपणा करू नका. विद्यार्थीवर्गाने मेहनत घ्यावी. शुभ दि. – ८,९.

मिथुन – अधिकारप्राप्तीचा योग
मिथुनेच्या सप्तमेषात मंगळ प्रवेश व बुध-शुक्र युती होत आहे. नोकरीत तुमचे महत्त्व वाढेल. अधिकारप्राप्तीचा योग येईल. राजकीय क्षेत्रात विचारांना चालना मिळेल. तुमच्या हातून जेवढे चांगले कार्य होईल तेवढे करण्याचा जोरदार प्रयत्न करा. व्यवसायात जम बसेल. कोर्टकेस संपवण्याचा प्रयत्न यशस्वी होऊ शकतो. शुभ दि. – ५,६.

कर्क – आत्मविश्वासाला लगाम घाला
कर्केच्या षष्ठस्थानात मंगळ प्रवेश व बुध-शुक्र युती होत आहे. विरोधकांच्या चुका बुद्धिचातुर्याने दाखवण्यात तुम्हाला यश मिळेल. राजकीय क्षेत्रात नम्रता ठेवा. आत्मविश्वासाला थोडा लगाम घाला. सामाजिक क्षेत्रात शनिवारी तुमच्याबद्दल गैरसमज होईल. नोकरीत कामाचा व्याप राहिल. विद्यार्थीवर्गाने नियमात राहावे. शुभ दि. – ७,८.

सिंह – जवळच्यांना दुखवू नका
सिंहेच्या पंचमेषात मंगळ प्रवेश. सूर्य नेपच्यून युती होत आहे. क्षेत्र कोणतेही असो महत्त्वाची कामे याच आठवडय़ात पूर्ण करा. राजकीय क्षेत्रात तुमची प्रतिष्ठा कोणाच्या कार्याने वाढली आहे याचा विचार करा. जवळच्या व्यक्तींना दुखवू नका. कला-क्रीडा क्षेत्रांतील निर्णय आताच घ्या. विद्यार्थीवर्गाने काळजी घ्यावी. शुभ दि. – ५,६.

कन्या – मनोधैर्य उत्तम राहील
कन्येच्या सुखस्थानात मंगळ प्रवेश करीत आहे. बुध-शुक्र युती होत आहे. कोणत्याही प्रसंगात कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करताना मागचा पुढचा विचार करा. या आठवडय़ात तुमचे मनोधैर्य उत्तम राहील. राजकीय क्षेत्रात वरिष्ठांची मर्जी राखा. नोकरीत वर्चस्व दाखवण्याचा प्रयत्न करू नका. प्रवासात सावध रहा. शुभ दि. – ५,६.
तूळ
परदेशगमनाची संधी
तूळ राशीच्या पराक्रमात मंगळ प्रवेश करीत आहे. सूर्य नेपच्यून युती होत आहे. रविवारी एखादा महत्त्वाचा प्रसंग येईल. राजकीय क्षेत्रात तुमची चर्चा वरिष्ठांच्या बरोबर याच आठवडय़ात करा. व्यवसायात भावना व व्यवहार यांचा योग्य मेळ राखा. कला – क्रीडा क्षेत्रांत चमकाल. परदेशात जाण्याची संधी मिळेल. शुभ दि. – ७,८.

वृश्चिक – प्रवासाचे बेत ठरवाल
वृश्चिकेच्या धनस्थानात मंगळ प्रवेश व बुध-शुक्र युती होत आहे. तुम्ही दुसऱयाची गरज ओळखून त्याला मदत करण्याच्या भानगडीत जास्त पडू नका. आर्थिक व्यवहारात सावध रहा. स्वभावात चिडचिडेपणा येईल. सामाजिक कार्यात हिशेबाचे काम नीट सांभाळा. दूरच्या प्रवासाचा बेत ठरवाल. शुभ दि. – ९,१०.

धनु- प्रभाव वाढेल
स्वराशीत मंगळ प्रवेश करीत आहे. सूर्य-नेपच्यून युती होत आहे. आठवडय़ाच्या सुरुवातीला कठीण कामात यश मिळेल. राजकीय क्षेत्रात तुमचे यश पाहून स्पर्धा करणारे लोक संतापजनक कृत्य करतील. सामाजिक क्षेत्रात तुमचा प्रभाव वाढेल. शेअर्सचा अंदाज घेताना नुकसान टाळण्याचा प्रयत्न करता येईल. शुभ दि. – ५,६.

मकर – जमिनीसंबंधी प्रश्न येतील
मकर राशीच्या व्ययस्थानात मंगळाचे राश्यांतर होत आहे. साडेसाती चालू आहे. तुमच्या धाडसाचे व कर्तृत्वाचे कौतुक सर्वत्र होईल. जवळचे लोक तुमचा हेवा करतील व मनातून चडफडतील. प्रगतीची संधी मिळेलच. रागावर नियंत्रण ठेवा. कौटुंबिक तणाव कमी झाला तरी वाटाघाटीसंबंधी, जमिनीसंबंधी प्रश्न येतील. चित्रपटसृष्टीत नवी संधी मिळेल. शुभ दि. – ५,६.

कुंभ – लोकप्रियता वाढेल
कुंभेच्या एकादशात मंगळ प्रवेश व बुध शुक्र युती होत आहे. आठवडय़ाची सुरुवात कटकटीची वाटली तरी त्यानंतर तुमची प्रगती होईल. राजकीय क्षेत्रात तुमचे स्थान नव्याने प्रस्थापित करण्याची संधी मिळेल. सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा व लोकप्रियता वाढेल. लोकांच्या उपयोगी पडतील अशा महत्त्वाच्या वेगळय़ाच योजना तुम्ही बनवा. शुभ दि. – ५,७.

मीन – उतावळेपणा करू नका
मीन राशीच्या दशमेषात मंगळ प्रवेश व बुध-शुक्र युती होत आहे. प्रगतीची संधी तुमच्या जवळपास दिसेल. कुठेही उतावळेपणा करू नका. राजकीय क्षेत्रात तुमच्या परीक्षेचा कालावधी असेल. सामाजिक क्षेत्रात अडचणी आल्या तरी मार्ग शोधता येईल. व्यवसायात एखादी संधी समोरून तुमच्याकडे येईल. शुभ दि. – ९,१०.

आपली प्रतिक्रिया द्या