भविष्य – रविवार १८ ते शनिवार २४ फेब्रुवारी २०१८

96

>> नीलिमा प्रधान

मेष – प्रवासात सावध रहा
प्रकृतीची काळजी घ्या. प्रवासात सावध रहा. राजकीय क्षेत्रात बुद्धीचा वापर करून डावपेच टाका. सामाजिक कार्यात प्रतिष्ठा पणाला लावून कठीण काम करून घ्या. दर्जेदार लोकांच्या परिचयाचा फायदा करून घ्या. व्यवसायात जम बसेल. कौटुंबिक समस्या सोडवण्याचा योग्य मार्ग मिळेल.
शुभ दि. २३, २४

वृषभ – नवे काम मिळेल
मनावरील दडपण कमी होऊ शकेल. व्यवसायात वाढ होईल. नवे काम मिळेल. प्रवासात सावध रहा. राजकीय क्षेत्रात वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील. सामाजिक कार्यात स्नेही व मोठय़ा लोकांचे सहाय्य मिळेल. कोर्टकेसमध्ये तुम्हाला सावरून घेणारे मुद्दे मिळतील.
शुभ दि. – १८, १९

मिथुन – शेअर्समध्ये फायदा होईल
आठवडय़ाच्या सुरुवातीलाच महत्त्वाचा निर्णय घ्या. राजकीय क्षेत्रात कामांची पूर्ती करून तुमचे वर्चस्व वाढवता येईल. विरोधकांना शह देता येईल. सामाजिक प्रतिमा उजळेल. शेअर्समध्ये फायदा होईल. आर्थिक मदत घेऊन लोकसेवा करण्यात हातभार लावता येईल. नोकरीत वरिष्ठ खूश होतील.
शुभ दि. – १९, २०

कर्क – कुटुंबात अस्थिरता वाढेल
आपसात गैरसमज व मतभेद होतील. कुटुंबात अस्थिरता वाढेल. वृद्ध व्यक्तीच्या प्रकृतीची समस्या वाढेल. राजकीय क्षेत्रात तुमच्या स्पष्टवक्तेपणावर टीका होईल. नेते व सहकार्य करणारे लोक दुखावले जाऊ शकतात. सामाजिक कार्यात पद जाण्याची शक्यता आहे.
शुभ दि. – १९, २०

सिंह – मौल्यवान वस्तूची खरेदी
आठवडय़ाची सुरुवात तणावाची व धावपळीची असली तरी त्यानंतर मात्र तुम्ही ठरविलेला कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडता येईल. लोकसंग्रह वाढेल. मौल्यवान वस्तूची खरेदी कराल. थोरामोठय़ांबरोबर चर्चा यशस्वी होईल. आर्थिक मदत मिळेल. सामाजिक कार्य पूर्ण करा.
शुभ दि. २१, २२

कन्या – कठीण प्रसंगावर मात कराल
राजकीय क्षेत्रात प्रतिष्ठा सांभाळण्यासाठी प्रयत्न करा. बुद्धिमत्तेच्या जोरावर कठीण प्रसंगावर मात करू शकाल. तुमचे मत सत्याच्या जवळचे असले तरी ते पटवून देणे सोपे नाही. सामाजिक कार्याचा विस्तार करण्यात समस्या येतील. कुटुंबात जवळच्या माणसांना समजून घ्यावे लागेल.
शुभ दि. २३, २४

तूळ – नाट्य-चित्रपट-क्रीडा क्षेत्रात यश
क्षेत्र कोणतेही असो, तुमच्या कार्याचे कौतुक होईल. राजकीय क्षेत्रात तुम्ही कार्याची आखणी करा. वरिष्ठांच्या समोर तुमचे मुद्दे ठेवा. नाटय़-चित्रपट-क्रीडा क्षेत्रांत मेहनत घेतल्यास फारच मोठे यश मिळेल. कोणत्याही प्रसंगी आग्रही भूमिका ठेवू नका. यश मिळेल. व्यवसायाला योग्य दिशा मिळेल.
शुभ दि. २१, २२

वृश्चिक – विचारपूर्वक निर्णय घ्या
सप्ताहाच्या मध्यावर कुटुंबात वाद व मतभेद होतील. रागावर नियंत्रण ठेवा. नवीन दर्जेदार परिचय तुमचा उत्साह व आत्मविश्वास वाढवणार आहे. विचारपूर्वक निर्णय घ्या. प्रतिस्पर्ध्याला शह देण्यासाठी प्रयत्न करता येईल. राजकीय क्षेत्रात सामाजिक कार्याला प्रसंगानुरूप वेगळे वळण देण्याची वेळ येऊ शकते.
शुभ दि. – १८, १९

धनु – उत्साहवर्धक घटना
सप्ताहाच्या शेवटी तुमच्या कामात अडचणी येतील. वाहन जपून चालवा. राजकीय क्षेत्रात अडचणींवर मात करून तुमचे वर्चस्व सिद्ध करता येईल. कोणतेही कठीण काम पूर्ण करा. उत्साहवर्धक घटना घडेल. सामाजिक कार्याला थोरामोठय़ांची साथ मिळेल. आर्थिक सहाय्य मिळेल. व्यवसायात नवे कंत्राट मिळेल.
शुभ दि. २०, २१

मकर – श्रेष्ठत्व वाढेल
तुमच्या सहाय्यासाठी तुमचे हितचिंतक पुढे येतील. मनावरील ताण कमी होईल. राजकीय क्षेत्रात प्रतिष्ठा मिळेल. पूर्वी झालेला गैरसमज दूर होईल. श्रेष्ठत्व वाढेल. टीकेला उत्तर देण्यापेक्षा बुद्धीचा वापर चांगल्या कामासाठी करा. सामाजिक कार्याला नवे वळण देता येईल. जवळची माणसे तुमचे कौतुक करतील.
शुभ दि. १८, १९

कुंभ – सहकार्य मिळेल
या आठवडय़ात तुम्ही तुमच्या योजनांना चांगल्या प्रकारे पूर्ण करा. उत्साहाच्या जोरावर माणूस कठीण कामसुद्धा पूर्ण करतो. लोकांचे सहकार्य व प्रोत्साहन मिळेल. राजकीय क्षेत्रात तुमच्या मुद्याला अधिक महत्त्व प्राप्त होईल. सामाजिक कार्याच्या नव्या योजना व्यवस्थित तयार करा. लोकांसाठी व्यापक स्वरूपाचे काम करा. मदत मिळू शकेल.
शुभ दि. १९, २०

मीन – जिद्द कायम ठेवा
आत्मविश्वास प्रमाणात ठेवा. जिद्द सोडू नका. अरेरावी करण्याचा प्रयत्न कुठेही करू नका. भावनेच्या भरात कोणतेही वचन राजकीय क्षेत्रात कुणालाही देऊ नका. कायद्याच्या कक्षेत राहून समाजकार्य करा. वाटाघाटीत मतभेद होतील. जवळच्या कार्यकर्त्यांना दुखवू नका. प्रकृतीची काळजी घ्या.
शुभ दि. २१, २२

आपली प्रतिक्रिया द्या