रविवार १५ ते शनिवार २१ ऑक्टोबर २०१७

29
  • नीलिमा प्रधान

मेष : उत्साह वाढेल

अडचणीवर मात करून दिवाळीचा आनंद तुम्ही घेणार आहात. लक्ष्मीपूजनानंतर तुमचा उत्साह व आत्मविश्वास अधिक वाढेल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात नव्या योजनांचे धमाकेदार फटाके फोडता येतील. डावपेचांना योग्य वळण मिळेल. मौल्यवान वस्तूंची खरेदी करताना सावध रहा. शुभ दि. : २०, २१.

वृषभ : विचारपूर्वक निर्णय घ्या

दिवाळी उत्साहात व आनंदात साजरी कराल. पाडव्याच्या शुभमुहूर्तावर नवीन प्रोजेक्ट सुरू करण्यासाठी तयारी जास्त करावी लागेल. किरकोळ अडचणी येऊ शकतात. व्यवसायात कोणतीही गुंतवणूक करताना विचारपूर्वक निर्णय घ्यावा. राजकीय-सामाजिक क्षेत्रात वरिष्ठांचा सल्ला घ्या. शुभ दि. : १६, १७.

मिथुन : वर्चस्व वाढेल
नोकरीत महत्त्वाचा प्रश्न सोडवता येईल. तुमच्या कामाचे कौतुक होईल. दिवाळी आनंदात साजरी कराल. मौल्यवान वस्तुची खरेदी करताना सावध रहा. राजकीय-सामाजिक क्षेत्रात वर्चस्व वाढेल. घर, वाहन, जमीन इ. नव्या खरेदीचा शुभारंभ पाडव्याच्या दिवशी करता येईल. कलाक्षेत्रात संधी मिळेल. शुभ दि. : १५, २०.

कर्क : यशप्राप्ती होईल

दिवाळी आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. त्यामुळे सुख असो, दुःख हे आपण करावेच. राजकीय-सामाजिक क्षेत्रात लोकप्रियता वाढवण्याच्या दृष्टीने चांगले यश करता येईल. मोठे कंत्राट मिळवण्याचा प्रयत्न करा. नाटय़-चित्रपट क्षेत्रात नवीन संधी मिळू शकेल.
शुभ दि. : १५, १६.

सिंह : कार्याला दिशा मिळेल

जे ठरवाल ते करून दाखवता येईल. जोरदार प्रयत्न करा. तुमच्या कार्याला योग्य दिशा मिळेल. लोकप्रियता मिळेल. कुटुंबात आनंदी वातावरण राहील. पाडव्याच्या दिवशी नव्या कार्याचा, व्यवसायाचा आरंभ करता येईल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात महत्त्वाचे निर्णय घेऊन आत्मविश्वास वाढेल. शुभ दि. : १८, १९.

कन्या : अधिकार लाभतील

वाद व गैरसमजानंतर तुमचा प्रगतिरथ वेगाने धावणार आहे. राजकीय-सामाजिक क्षेत्रात स्वतःच्या हिमतीवर मोठे कार्य करता येईल. अधिकार मिळेल. नेते, सहकारी यांचा पाठिंबा वाढेल. व्यवसायात जम बसेल. दिवाळीच्या शुभमुहूर्तावर नवा कार्यारंभ होईल. विचारांना चालना देणारे प्रसंग घडेल. शुभ दि. : २०, २१.

धनु : महत्त्वाचे निर्णय घ्याल

तुमचे मनोधैर्य या आठवड्यात वाढणार आहे. स्वतःची व दुसऱ्याची कामे होतील. कुटुंबात तुमच्या निर्णयाचे कौतुक होईल. इतरांच्या सुखात सहभागी व्हाल. दिवाळीच्या शुभमुहूर्तावर एखादा महत्त्वाचा निर्णय घ्याल. प्रकृतीत सुधारणा होईल. व्यवसायात लाभ होईल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात नवे डावपेच टाकता येतील. शुभ दि. : १८, १९.

मकर : तुमचा प्रभाव वाढेल
सप्ताहाच्या सुरुवातीला तुमच्या कामात अडचणी येतील. नरकचतुर्दशीपासून तुमच्या मनातील योजना पूर्ण करण्याचे ठरवता येईल. दिवाळी साजरी करताना एखादी खंत मनात राहील. राजकीय-सामाजिक क्षेत्रात अभ्यासपूर्वक कार्य करा. महत्त्वाच्या कार्यात प्रभाव वाढेल. व्यवसायाला नवी कलाटणी मिळेल. शुभ दि. : १८, २०.

कुंभ : किरकोळ मतभेद होतील

दिवाळीच्या पाडव्याला शुभ समाचार मिळेल. व्यवसायाला योग्य दिशा मिळेल. परदेशात जाण्याची संधी नोकरी व शिक्षणासाठी मिळेल. कुटुंबात किरकोळ मतभेद शक्यता आहे. तुमच्या कामातील अडचणी कमी होतील. राजकीय-सामाजिक क्षेत्रात आत्मविश्वासाने कार्य करा. लोकांचे सहकार्य मिळेल. शुभ दि. : २०, २१.

मीन : वरिष्ठांची मर्जी राखा

तुमच्या आनंदावर कुणीतरी विरजण घालण्याचा प्रयत्न करील. रागावर नियंत्रण ठेवा. निसर्ग, प्राणी व देवता यांचे पूजन म्हणजे दिवाळी होय. त्याप्रसंगी होणारे पदार्थ करताना काळजी घ्या. राजकीय-सामाजिक क्षेत्रात व्याप वाढेल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांची मर्जी राखा. नव्याने प्रयत्न करा. शुभ दि. : १८, १९.

तूळ : जबाबदाऱ्या वाढतील

लक्ष्मी-कुबेर पूजनानंतर मनाला उभारी येईल. मनातील अंधकार दूर करणारी घटना घडेल नोकरीच्या प्रयत्नाला यश येईल. दूरच्या प्रवासाचा बेत ठरवाल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात नवी जबाबदारी देतील. व्यवसायात सुधारणा करण्याचा विचार उत्साह देणारा ठरेल.  शुभ दि. : २०, २१.

वृश्चिक : मनोबल राखा

लक्ष्मी-कुबेर पूजनानंतर कोणताही निर्णय घेण्याची घाई करू नका. राजकीय-सामाजिक क्षेत्रात चोहोबाजूने तुमच्यावर दबाव येण्याची शक्यता आहे. कुटुंबात इतरांच्या कामाची जबाबदारी घेऊ नका. व्यवसायात नम्रता ठेवा. थकबाकी वसूल करण्याचा प्रयत्न करा. शुभ दि. : १६, १७.

आपली प्रतिक्रिया द्या