कशी बनवायची झणझणीत कोल्हापुरी मिसळ ?

साहित्य –

३ वाटय़ा मोड आलेली मटकी, ४ मोठे कांदे, २ वाटय़ा ओले खोबरे, १ वाटी सुके खोबरे, ३ इंच आल्याचा तुकडा, २ लसणाचे गड्डे, १ जुडी कोथिंबीर,  २ मोठे चमचे कोल्हापुरी कांदा-लसूण चटणी, १ मोठा चमचा गरम मसाला पावडर किंवा अख्खा मसाला (यात ५-६ लकंगा, दालचिनीचा एक २ इंचाचा तुकडा, ५-६ काळीमिरी, धणे-जिरे १-१ चमचा) आणि २ बटाटे चिरून. मीठ, तेल, हिन्ग, हळद, तिखट, पाणी, फरसाण किंवा हॉट मिक्स, ब्रेड, बारीक चिरलेला कच्चा कांदा, लिंबू.

कृती – सर्वप्रथम पातेल्यात तेल तापवून त्यात हिंग, हळद घाला. मटकी, बटाटे टाकून परतावे, बुडेल इतके पाणी, तिखट, मीठ घालून शिजवून घ्यावी. यात थोडे पाणी राहिले तरी चालेल. त्यानंतर कांदे उभे पातळ चिरून घ्यावेत. यातला वाटीभर कांदा बाजूला ठेवून उरलेला कांदा, दोन्ही प्रकारचे खोबरे, गरम मसाला तेलावर भाजून बारीक वाटाके. आले, लसूण, कोथिंबीर बारीक वाटाकी. वाटताना जास्त पाणी घालू नये. मग जाड बुडाच्या पातेल्यात तेल तापवून हिंग, हळद आणि उभा चिरलेला वाटीभर कांदा, कोल्हापुरी चटणी टाकावी. परतून घेऊन मग दोन्ही वाटणे घालून पुन्हा परतावे. त्यात मीठ आणि ४ कप पाणी घालून उकळी आणाकी. एका खोलगट प्लेटमध्ये २ मोठे चमचे फरसाण घ्यावे. त्यावर मटकी, थोडा कच्चा कांदा, कोथिंबीर घालून मग १ पळी कट घालावा. कट घेताना ढकळून घ्यावा. आवडतो त्यानी वरचा तकंग घ्यावा. लिंबू पिळाका. ब्रेडबरोबर छान लागतो.