मोदी 5 वर्षांपूर्वीच ‘त्या’ विद्यार्थ्याला म्हणाले होते की, 2024 च्या तयारीला लाग

135
pm-modi

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात पुन्हा एकदा ‘मोदी सरकार’ केंद्रात पाहायला मिळणार आहे. मात्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार की नाही यासाठी वेगवेगळे सर्वेक्षण कंपन्या आणि वृत्तवाहिन्या सर्व्हे घेताना पाहायला मिळत होत्या. मात्र नरेंद्र मोदी हे पहिल्यांदा पंतप्रधान झाले तेव्हाच ठाम होते की दुसरी टर्म देखील त्यांनाच मिळणार. एका विद्यार्थ्याला त्यांनी भर कार्यक्रमात ही गोष्ट अगदी स्पष्ट सांगितली होती.

5 सप्टेंबर 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थ्यांशी संवाद साधत होते. त्यावेळी इम्फाळ मधील जवाहर विद्यालयाच्या एका विद्यार्थ्यांने ‘मला पंतप्रधान व्हायचे असल्यास काय करू?’ असा प्रश्न केला होता. त्यावर पंतप्रधान मोदी हसले आणि थोडं थांबून म्हणाले की, 2024 च्या निवडणुकीच्या तयारीला लाग, असे उत्तर दिले. ‘याचा अर्थ असा होतो की, तोपर्यंत मला कोणताही धोका नाही’, असंही ते म्हणाले. त्यांच्या या विधानातून 2019 ची दुसरी टर्म आपणच जिंकणार असे स्पष्ट संकेत मोदींनी पहिलाच काही महिन्यांत दिले होते. ‘आपल्या देशात लोकशाही आहे. संविधानाने आपल्याला इतकी ताकद दिली आहे की, देशाचा विश्वास जिंकला देशाच्या जनतेचा प्रेम जिंकलं तर कुणी सामान्य व्यक्ती देखील या पदावर पोहोचू शकतो’, असे ही ते म्हणाले होते.

मे 2014 मध्ये नरेंद्र मोदी हे पहिल्यांदा पंतप्रधान झाले. त्यानंतर त्यांनी अत्यंत वेगाने आणि विशिष्ट दिशेने कामाला सुरुवात केली. विद्यार्थ्यांशी थेट संवाद हा त्याचाच एक भाग होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनानिमित्त एक कार्यक्रम घेऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या कार्यक्रमात विविध ठिकाणच्या निवडक विद्यार्थ्यांनी मोदींना प्रश्न विचारले आणि त्याची मोदींनी उत्तर दिली होती.

आपली प्रतिक्रिया द्या