तुम्हाला मुस्लिम मुलगी नाही मिळाली? जिनांना मुलीचा सवाल

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

पाकिस्थानचे संस्थापक मोहम्मद अली जिना यांची मुलगी दीना वाडिया यांचं गुरुवारी न्यू-यॉर्कमध्ये निधन झालं. त्यांचा एक किस्सा अत्यंत प्रसिद्ध आहे. दीना यांनी पारशी मुलाशी लग्नाचा निर्णय मोहम्मद जिना यांना कळवल्यानंतर हा किस्सा घडला होता, ज्यामध्ये दीना यांनी वडिलांचा आवाज गप्प केला होता.

दीना मुंबईतील प्रसिद्ध पारशी परिवारातील मुलगा नेविल नेस वाडिया यांच्यांशी लग्न करण्याच्या तयारीत होत्या. त्यांनी ही माहिती वडिलांनी कळवली. त्यावर जिना प्रचंड संतापले आणि त्यांनी सल्ला दिला की हिंदुस्थानमध्ये लाखों मुस्लिम मुलं आहेत. तेव्हा त्यांच्यापैकी कोणताही एक मुलगा पसंत कर. यावर दीना यांनी जिना यांना खणखणीत सवाल केला. ‘बाबा तुमच्या लग्नाच्यावेळी हिंदुस्थानात लाखों मुस्लिम मुली होत्या. मग तुम्ही मुस्लिम मुलीशी लग्न का नाही केले?’. जिना यांनी एक पारशी मुलगी रतनबाई ऊर्फ रूटी यांच्याशी विवाह केला होता.