दिवसभरात किती पाणी प्यावे? वाचा सविस्तर…

अतिप्रमाणात पाणी प्यायल्यामुळे शरिरावर अनेक अपायकार दुष्परिणाम होतात.

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

सुद्ढ आरोग्यासाठी सकस आहाराबरोबरच भरपूर पाणी पिणेही आवश्यक असते. हे आपण नेहमी ऐकत असतो. पण तुम्हांला माहित आहे का की जास्त पाणी पिणे तुमच्या जीवावरही बेतू शकते. शरीरात गरजेपेक्षा जास्त पाणी गेल्यास किडनी फेल होऊ शकते एवढेच नाही तर ब्रेन हॅम्ब्रेजही होऊ शकतो. असा दावा संशोधकांनी केला आहे. बिजनेस इनसायडर या वैद्यकीय मासिकात याबद्दल माहिती देण्यात आली आहे.

संशोधकांनुसार किडनी एका तासात एक लिटर पाण्यावरच प्रक्रीया करू शकते. यामुळे जास्त पाणी पिल्यास शरीरातील सोडीयमचे प्रमाण वेगाने कमी होते. ज्यामुळे किडनीवर ताण येतो. तसेच प्रमाणापेक्षा जास्त पाणी पिल्यानंतर डोके दुखी, भास होणे, झोप न येणे अशी लक्षण दिसू लागतात. मेंदूवर, रक्ताभिसरणावर त्याचा गंभीर परिणाम होतो. अशा वेळी ब्रेन हॅम्ब्रेज होऊन व्यक्ती कोमात जाऊ शकते किंवा त्याचा मृत्यू होऊ शकतो.

साधारणत सामान्य व्यक्तीने दिवसाला तीन ते चार लीटर पाणी पिणे आवश्यक आहे. पण अन्नपदार्थां मधूनही शरीराला पाणी मिळत असतं. यामुळे तीन ते चार लिटर नुसत पाणी पिण्याची गरज नसते. कारण अन्नपदार्थामधूनही पाणी आपल्या शरीरात जातं.

किडनी एका तासात ८०० ते १००० लीटर पाण्यावर प्रक्रीया करू शकते. यामुळे शरीरात अतिरिक्त पाणी जमा झाल्यास त्याचा ताण रक्तपेशींवर येतो व त्यात पाणी जमा होऊ लागते व शरीराला सूज येते या अवस्थेला इनटॉक्सिकेशन असे म्हणतात. यामुळे ब्लड प्रेशर झपाटयाने वाढते. जेवणानंतरही जास्त पाणी पिऊ नये. कारण त्यामुळे जठरातील पाचक रस काम करणं बंद करतो. अपचन. गॅस, पित्त यासारख्या समस्या निर्माण होतात. दरम्यान, रिकाम्या पोटी घटाघटा पाणी पिल्याने हृदयावर ताण येतो. यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका निर्माण होतो.