छान आई-बाबा व्हा…

आई बाबा आणि त्यांचं पिल्लू. तिघांचं छानसं जग. तिघांमधील संवाद सुसंवाद व्हावा म्हणून

> रात्री जेवताना मुलांसोबत गप्पा मारायच्या

> मुलांसमोर भांडण-तंटा करु नये.

> मुलांसमोर वडिलधाऱया माणसांचा अपमान करु नका.

> मुलांच्या हातून चुका घडल्यास त्यांना न मारता प्रेमाने चूक निदर्शनास आणून द्या.

> चांगले काम केल्यावर मुलांचे मनापासून कौतुक करा.

> अपेक्षांचे ओझे त्यांच्यावर लादू नका.

> मुलांदेखत कुठलंही व्यसन करू नका.

> मुलांना गृहीत धरण्यापेक्षा त्यांच्या आवडी-निवडी जाणून घ्या.

> मुलांसमोर अपशब्द काढू नका.

> ऑफिसमधले टेन्शनचा मुलांवर परिणाम होऊ देऊ नका.

> मुलांना कोणत्या गोष्टीची भीती घालून देऊ नका.

> चूक तिथे चूकच आणि बरोबर तिथे प्रशंसा करायला हवी.

> मुंलांना मागितलेली वस्तू दिलीच पाहिजे असे नाहीय, त्यांना ती आवश्यकता असेल तरच त्याचा पुरवठा करा.

> लहान वयातच त्यांना छंद जोपासायला शिकवा.

> मुलं पालंकांचे अनुकरण करत असतात अशावेळी चांगला माणूस म्हणून कसे जगता येईल ते पाहा.