चमचमती भांडी

स्वयंपाकासाठी स्त्रीया वेगवेगळ्या प्रकारची भांडी वापरतात. यात स्टीलची काही भांडी असतात, काही काचेची, चिनी मातीची किंवा पितळेची आणि ऍल्युमिनियमचीही भांडी असतात. धातू वेगवेगळा असल्याने ती साफ करण्याची तऱहाही वेगळी असते. मग ही भांडी चमकवायची कशी ते जाणून घेऊया

 > कांद्याचा रस आणि व्हिनेगर समप्रमाणात घेऊन त्या मिश्रणाने भांडी घासल्यास ती चमकू लागतील. या भांडय़ावरील चिकट पदार्थ घालवायचे तर लिंबाचा रस आणि सिरका यांचे मिश्रण गरम करून घ्या.

> पितळेची भांडी साफ करायची तर लिंबू अर्धा कापून घ्यायचा. त्यातल्या एका भागावर थोडे मीठ भुरभरवायचे. त्याने भांडी चकाचक होतील.

> ऍल्युमिनियमची भांडी चमकवण्यासाठी भांडी घासण्याच्या पावडरीत थोडे मीठ घाला.

> ऍल्युमिनियमच्या भांडय़ात पदार्थ जळून काळी झाल्यास त्यात पाणी आणि थोडय़ा कांद्याच्या फोडी घालून ते उकळून घ्या. घासल्यावर स्वच्छ होईल.

> स्वयंपाकामुळे चिकट झालेल्या भांडय़ांसाठी थोडं व्हिनेगर कापडात घेऊन त्याने भांडी घासा. मग साबणाने भांडे चांगले धुऊन घ्या. चिकटपणा जाईल.

> प्रेशर कुकरवरचे डाग घालवण्यासाठी कुकरमध्ये थोडे पाणी, 1 चमचा वॉशिंग पावडर,अर्धा लिंबू घालून उकळून घ्या. नंतर घासा. डाग निघून जातील.