रेसिपी-चॉकलेट शिरा

साहित्य – एक वाटी रवा, दोन चमचे साजूक तूप वा रिफाइंड तेल, दोन चमचे कोको पावडर (किंवा चॉकलेट फ्लेवरचा बोर्नव्हिटा, हॉर्लिक्स), साखर पाव वाटी, दीड वाटी पाणी

कृती- प्रथम शिऱ्यासाठी करतो तसा रवा तुपावर अथवा रिफाइंड तेलावर खमंग भाजून घ्यावा. एकीकडं दुसऱया भांडय़ात दीड वाटी पाणी घेऊन गैसवर पाक करण्यासाठी ठेवायचं. त्यात साखर पूर्ण विरघळली की, मग कोको पावडर दोन चमचे घालावी. रवा भाजल्यानंतर हे मिश्रण रव्यात घालून व्यवस्थित हलवावं. किमान पाच मिनिटं झाकून ठेवा.