‘टिप्स-फालुदा

साहित्य 2 कप व्हॅनिला आइस्क्रीम, 1 कप फालुदा शेव, गुलाबाचे सरबत, अर्धा कप ताजे क्रीम, 1 किलो दूध, 2 छोटे चमचे गुलाब एसेंस, 1/2 कप बदाम व पिस्ते, चार चमचे साखर.

पाककृती दुधात साखर घालून दूध आटवा. आटवलेले दूध थंड झाल्यावर त्यात गुलाब एसेंस टाका. आइस्क्रीम सर्व्ह करताना एका आइस्क्रीम ग्लासात गुलाब सरबत टाकून त्यावर फालुदा शेव टाका. मग त्यावर आटवलेले दूध घाला. त्यावर व्हॅनिला आइस्क्रीम घालून क्रीम घाला. क्रीमवर बदाम, पिस्ते टाका.