घरीच तयार करा लिपस्टिक…

>>डॉ. अस्मिता सावे, रिजॉईस वेलनेस, आहारतज्ज्ञ

आपण सुंदर दिसावे, सर्वांनीच आपल्या रूपाचे कौतुक करावे असे प्रत्येकाला वाटत असते. त्यासाठी आपण नेहमीच वेगवेगळे प्रयोग करत असतो. हे प्रयोग करत असताना आपल्या शरीरात अनेक केमिकल जातात. आता हे केमिकल तुमच्या पोटात जाण्यापासून तुम्ही थांबवू शकता. स्त्रिया आपल्या कमळासारख्या रेखीव ओठांना अजून आकर्षक करण्यासाठी लिपस्टिकचा वापर करतात. लिपस्टिक म्हणजे जणू महिलांची दुसरी ओळखच.

वाचा – घरीच तयार करा तुमची टूथपेस्ट…

बाजारामध्ये मिळणाऱ्या लिपस्टिकमध्ये अनेक केमिकल असतात व शिशाचे प्रमाण ही जास्त असते. ओठ हा आपल्या शरीरातील खूप महत्वाचा घटक आहे. अशामध्ये ओठाला काही ईजा झाली तर त्याचा परिणाम थेट आपल्या सौदर्यवरती होतो. यावर उपाय म्हणून तुम्ही घरच्या घरी लिपस्टिक तयार करू शकता. हे वाचून दचकून जाऊ नका पण ही गोष्ट खरी आहे. अगदी कमीत कमी साहित्यामध्ये तुम्ही हे बनवू शकता. चला तर मग तयार करून घरच्या घरी लिपस्टिक

साहित्य : एक मोठं बीट, कोकोनट ओईल

कृती : बीट स्वच्छ धुवून त्याचे तुकडे करून घ्या. एका भांड्यामध्ये पाणी ठेऊन त्यात अजून एक भांडे ठेवा व त्यात बीटाचे तुकडे टाका व हे तुकडे डबल बॉईल करून घ्या. बीटाचे तुकडे नरम झाल्यानंतर आचेवरून काढून घ्या. आता बीटाचे तुकडे चुरून घ्या व मिक्सर मधून काढून घ्या. तयार झालेले मिश्रण गळून घ्या व मिश्रणामध्ये कोकोनट ओईल टाका. तयार झालेले मिश्रण लिपस्टिक मोड मध्ये टाकून फ्रीजमध्ये सेट होण्यसाठी ठेवा. वापरण्यासाठी तयार आहे घरी तयार केलेली हेल्दी लिपस्टिक.