टिप्स-मुगाचे वडे (मुगोरे)

साहित्य मुगाची डाळ, आले, लसूण, मीठ, ओल्या मिरच्या.

कृती सर्वप्रथम रात्री मुगाची डाळ भिजत घालावी. सकाळी ती चाळणीत काढून त्यातील पाणी काढावे. त्यानंतर मिक्सरमधून डाळ बारीक वाटून घ्यावी. डाळ वाटताना त्यातच आले, लसूण, ओल्या मिरच्या चवीप्रमाणे घालून वाटावे. वाटलेले पीठ हाताने खूप फेसावे त्यात चवीप्रमाणे मीठ घालावे. नंतर या पिठाचे वडे थापून तेलात तळून काढावे.