उन्हाळयात बाळाची काळजी

लहान बाळाला उन्हाळ्याचा, उकाडय़ाचा त्रास सर्वाधिक होतो. त्यामुळे चिडचिड वाढून ते अस्वस्थ होते. उन्हाळ्यातही बाळ आनंदी कसे राहील

 • उन्हाळ्यात नेहमी सुती कपडे घालावेत. अयोग्य कपडय़ांमुळे बाळाला घामोळे किंवा पुरळ येऊ शकतात.
 • सकाळी बाळाला घराबाहेर नेताना स्लीव्हलेस अथवा बिन बाह्यांचे कपडे कधीच घालू नका.
 • उन्हातून बाळाला घेऊन प्रवास करणार असाल तर समर हॅट घाला. या हॅटला इलॅस्टिक रबर नसावे.
 • बाळाचे डायपर दर तीन तासांनी बदलणे गरजेचे आहे. उन्हाळ्यात याबाबत सावध राहा. कारण उन्हाळ्यात येणारा घाम व ओलसरपणामुळे बाळाला डायपर रॅशेस होण्याची शक्यता असते.
 • उन्हाळ्यात मुलांना डिहायड्रेशनचा त्रास मोठया प्रमाणावर होतो. यासाठी बाळाला वेळेवर दूध द्या.
 • नवीन डायपर घालण्यापूर्वी त्याचे गुप्तांग प्रथम स्वच्छ धुवून कोरडे करा व मगच त्याला नवीन डायपर घाला.
 • उन्हाळ्यात लहान मुलांची भूक कमी होते. म्हणून त्याला फळांचा रस, ताक, मिल्कशेक असे द्रवपदार्थ द्या.
 • बाळाच्या संपूर्ण शरीरावर खूप पावडर थापून ठेवणे टाळा. कारण घामामुळे पावडर ओली होऊन त्वचेच्या समस्या निर्माण होऊ शकते.
 • बाळाला दररोज अंघोळ घाला. सायंकाळी क्रिम मसाज करून थंड पाण्याचा स्पंजबाथ करा. यामुळे त्याला रात्री शांत झोप लागेल.
 • उन्हाळ्यात तेल मसाज करू नका. तेलमसाजमुळे उष्णतेचे पुरळ, खाज, गळू अशा समस्या निर्माण होऊ शकतात.
 • बाळ दोन वर्षांपेक्षा मेठे असेल तर त्याला वॉटरस्पोर्टसाठी जरूर घेऊन जा.
 • एसीचे तापमान दिवसभर 24 अंशावर ठेवा.  कारण तापमान वाढवले तर सर्दी-खोकला होऊ शकतो. अंघोळ घातल्यावर लगेच एसीच्या थंड वातावरणामध्ये ठेऊ नका.