असा घालवा चष्मा कायमचा!

सामना ऑनलाईन । मुंबई

सतत अनेक तास काम करणे, झोप पूर्ण न होणे, मोबाईल-कॉम्युटरवर तासन्तास काम करणे यामुळे हल्ली चष्मा लागण्याचे प्रमाण वाढत आहे. लहान किंवा तरुण वयात लागणारा चष्मा आणि दृष्टी सुधारण्यासाठी आयुर्वेदात अनेक उपाय सांगितले आहेत.

चाळिशीच्या आत आणि लहान वयात चष्मा लागलेली व्यक्ती काही वेळा इतरांच्या चेष्टेचा विषयही ठरते. शिवाय चष्मा सांभाळणे तो सतत सोबत बाळगणे याचीही जबाबदारी असते. यासाठी चष्म्याचा नंबर कमी करणारे उपाय नक्कीच उपयुक्त ठरतात. या उपायांमुळे महिन्याभरात चष्म्याचा नंबर कमी होऊ शकतो.

सूर्यफुलांच्या बियांचे सेवन

सूर्यफुलांच्या बियांच्या सेवनामुळे डोळ्यांचे आरोग्य सुधारते. या बियांत जीवनसत्त्व क, ई, बिटा केरोटीन आणि अॅन्टीऑक्सिडंट्स असतात. ही जीवनसत्त्वे डोळ्यांसाठी लाभदायक आहेत.

हिरव्यागार गवतावर अनवाणी चाला

रोज रात्री झोपण्यापूर्वी मोहरीच्या तेलाने पायांच्या तळव्यांना मसाज करा. सकाळी उठून हिरव्या गवतावर अनवाणी चाला. यामुळे डोळ्यांची कमजोरी दूर होण्यास मदत होते.

  • जिरे आणि खडीसाखर एकत्र सम प्रमाणात वाटा. हे मिश्रण दररोज एक चमचा तुपासोबत घ्या.
  • दररोज रात्री झोपण्यापूर्वी तिळाच्या तेलाने पायांना मसाज करा.
  • रात्री त्रिफळा पाण्यात भिजवून सकाळी त्या पाण्याने डोळे धुवा.
  • रोज रात्री ६-७ बदाम पाण्यात भिजत घाला. सकाळी ते बदाम खा.
  • ३-४ हिरव्या वेलच्या एक चमचा बडीशेपसोबत वाटा. हे मिश्रण एक ग्लास दुधासोबत घ्या.
  • गाजराचे ज्युस नियमित प्यायल्याने दृष्टी सुधारते.
  • एक चमचा बडीशेप, २ बदाम आणि अर्धा चमचा खडीसाखर एकत्र करून बारीक पूड करा. रात्री झोपण्याआधी एक ग्लास दुधात हे मिश्रण टाकून प्या.
  • रोजच्या जेवणात नियमितपणे हिरव्या भाज्यांचा समावेश करा. या भाज्यांमधील अॅन्टीऑक्सिडंट्स डोळ्यांचे आरोग्य निरोगी राखतात.