लिपस्टीक घेताय ? मग हे वाचा

सामना ऑनलाईन। मुंबई

लिपस्टीकमुळे ओठांबरोबरच चेहऱ्याचेही सौंदर्य खुलते. यामुळे लिपस्टीक नेहमी काळजीपूर्वक निवडावी. रंग आवडला म्हणून कोणतीही लिपस्टीक घेणे टाळावे. त्यापेक्षा आपल्या त्वचेच्या रंगावर खुलुन दिसेल अशा रंगाची लिपस्टीक घ्यावी.

fair-women

गौर वर्ण... गौरवर्णीय महिलांच्या चेहऱ्यावर व ओठांवर कुठलीही लिपस्टीक शोभून दिसते. पण तरीही अबोली, गुलाबी व लाल रंगाच्या शेड त्यांच्यावर अधिकच छान दिसतात. चेरी रंगही या महिलांवर उठुन दिसतो.

mid-colour

गव्हाळ वर्ण…असलेल्या महिलांवर लाल , रस्ट ब्रिक लाल, मरुन किंवा जांभळा रंगही शोभून दिसतो. केशरी व गुलाबी आणि ब्राऊन रंगाची शेडही गव्हाळ वर्णाच्या महिलांवर खुलुन दिसते. मॅट फिनिश असलेली लिपस्टीकचा वापर करावा.

dark-women

सावळ्या रंगाच्या महिलांनी गुलाबी,ब्राऊन, आणि बेरी शेडही उठून दिसते.