धुक्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…

सामना ऑनलाईन । मुंबई

गुलाबी थंडीच्या दिवसांमध्ये बाहेर फिरायला जाण्याची मजाच वेगळी असते. नाताळ आणि नवीन वर्षाच्या सुट्यांचा आनंद घेण्यासाठी बरेच जण लाँग ड्राईव्हला जाण्याचा पर्याय निवडतात. मात्र दिवस थंडीचे असल्याने गाडीसमोर धुके आल्यास अपघात होण्याची शक्यता असते. कारण धुक्यामुळे तुमची गाडी समोरच्या गाडीला किंवा तुम्हाला समोरून येणारे वाहन दिसत नाही. मात्र अशावेळी काय काळजी घ्यायला हवी ते वाचा…

> धुक्यामध्ये गाडी चालवताना मोबाईलवर बोलणे टाळा.

> गाडीमध्ये मोठ्या आवाजात गाणी सुरू ठेऊ नका.

> खिडकीच्या काचा उघड्या ठेवा. कारण समोरून किंवा मागच्या बाजूने आलेल्या वाहनाचा आवाज तुम्हाला ऐकू येईल.

> धुक्यामधून गाडी सावकाश आणि कमी वेगात चालवा.

> रस्त्यावर किंवा घाटामध्ये रांग असल्यास शिस्त पाळा आणि रांग मोडू नका. दुसऱ्या वाहनापासून सुरक्षित अंतर ठेवा.

> पुढील गाडीला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न धोक्याचा ठरू शकतो.

> धुक्यात गाडी चालवताना फॉग लाईटचा वापर करणे योग्य आहे. ही सुविधा नसल्यास हेडलाईट लो बिमवर ठेवावा.

> समोरच्याला किंवा मागच्याला तुमची गाडी दिसावी यासाठी ब्लिंकर्स पूर्ण वेळ सुरू ठेवावे.

> वळणावळणाच्या रस्त्यावर किंवा वळण घेताना इंडिकेटर देण्याचे टाळू नका. ते धोक्याचे ठरू शकते.