धक्कादायक! रुग्णाच्या पोटातून काढले चमचे, स्क्रू ड्रायव्हर, टूथब्रश आणि चाकू

133

सामना ऑनलाईन। सिमला

अनेकवेळा आपल्या आजूबाजूला अशा काही विचित्र घटना घडतात की ज्यांच्यावर विश्वास ठेवणे कठीण असते. अशीच एक अविश्वसनीय घटना हिमाचल प्रदेशमधील मंडी शहरात घडली आहे. येथे एका मानसिक रुग्णाच्या (35) पोटातून डॉक्टरांनी चक्क 8 चमचे, 2 स्क्रूड्रायव्हर , 2 टूथब्रश आणि 1 चाकू बाहेर काढला आहे. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून रुग्णाला पोटदुखीची तक्रार होती. यामुळे घरातल्यांनी त्याला येथील श्री लाल बहादुर शास्त्री सरकारी रुग्णालयात दाखल केले होते. त्याची सोनोग्राफी केली असता त्याच्या पोटात धातूच्या 13 वस्तू असल्याचे डॉक्टरांना आढळले. यामुळे डॉक्टरांनी त्याच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. शस्त्रक्रिया करतेवेळी त्याच्या पोटातून 8 चमचे, 2 स्क्रूड्रायव्हर , 2 टूथब्रश आणि 1 चाकू अशा 13 धातूच्या वस्तू बाहेर काढण्यात आल्या. एवढ्या वस्तू त्याच्या पोटात गेल्याच कशा असा प्रश्न डॉक्टरांना पडला होता. पण काही तपासण्या केल्यानंतर रुग्ण मानसिक रुग्ण असल्याचे समोर आले. द

आपली प्रतिक्रिया द्या