१२वीचा निकाल:कोकणचा षटकार; मुंबई शेवटून पहिली

प्रातिनिधीक फोटो

सामना प्रतिनिधी । मुंबई

बारावीच्या निकालात यंदा कोकण विभागाने सर्वाधिक निकालाचा षटकार लगावला असून सलग सहाव्यांदा प्रथम क्रमांकावर आपले नाव कोरले आहे. कोकण विभागाचा निकाल ९५.२० टक्के लागला आहे. या निकालात सर्वात कमी निकालाची नोंद मुंबईच्या नावावर आहे. मुंबईचा निकाल ८८.२१ टक्के इतका आहे. राज्याचा निकाल ८९.५० टक्के लागला असून त्यात मुलीच चॅम्पियन्स ठरल्या आहेत.
गुणपत्रिकेचे वाटप ९ जूनला दुपारी ३ वा.
अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा ११ जुलैपासून.
गुणपडताळणीसाठी अर्ज ः ३१ मे ते ९ जून.
छायाप्रतीसाठी अर्ज ः ३१ मे ते १९ जून.
श्रेणी सुधार योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना दोन संधी.

कोकण ९५.२०
कोल्हापूर ९१.४०
पुणे ९१.१६
संभाजीनगर ८९.८३
अमरावती ८९.१२
नागपूर ८९.०५
नाशिक ८८.२२
लातूर ८८.२२
मुंबई ८८.२१

उत्तीर्णतेचे प्रमाण
मुली
९३.०५%
मुले
८६.६५%