आंघोळीसाठी नदीवर गेलेल्या बारावीच्या विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

सामना प्रतिनिधी । जळगाव
भुसावळ येथे धुळवडीनंतर नदीवर अंघोळीसाठी गेलेल्या बारावीच्या विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाला आहे. प्रशांत सुरेश चव्हाण (१८) असं मयत विद्यार्थ्याचे नाव आहे. प्रशांत शुक्रवारी मित्रांसोबत धुलिवंदनानिमित्त मजामस्ती करण्यासाठी नदीवर गेला होता. दरम्यान मुक्ताई घाटावर पाय घसरून तो नदीत पडल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. प्रशांतच्या मृत्यूने कुटुंबीयांवर आणि परिसरात शोककळा पसरली आहे.