कर्नाटकच्या बसेसवर ‘जय महाराष्ट्र!’

2

सामना ऑनलाईन, मुंबई

कानडी नगरविकासमंत्री रोशन बेग यांनी महाराष्ट्रद्वेशी बांग दिल्यामुळे आज सीमाभागासह राज्यभर संतापाचा उद्रेक झाला. सीमाभागात तर या घटनेचे तीक्र पडसाद उमटले. सीमाभागातील कानडी बसेस रोखून शिवसैनिकांनी त्यावर भगव्या रंगाने ‘जय महाराष्ट्र’ लिहून जबरदस्त दणका दिला. कर्नाटक सरकार कायद्याचा बडगा उगारून सीमाभागातील बांधवांची गळचेपी करणार असेल तर शिवसेना तसे होऊ देणार नाही, असा इशाराही देण्यात आला.

कानडी सरकार सीमाभागातील मराठी भाषक जनतेला महाराष्ट्रात येण्यापासून परावृत्त करण्यासाठी कर्नाटक सरकार एकही संधी सोडत नाही. मराठी भाषकांची आंदोलने रोखणे, कानडी पोलिसांकडून त्यांना होणारी मारहाण असे अनेक प्रकार केले जातात. त्याचाच एक भाग म्हणून सोमवारी कर्नाटकचे नगरविकासमंत्री रोशन बेग यांनी ‘कोणत्याही निवडणुकीत निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी कार्यक्रमात तसेच सभागृहात ‘जय महाराष्ट्र’ म्हटल्यास तसेच कर्नाटक राज्यविरोधी घोषणा दिल्यास थेट त्यांचे पद आणि सदस्यत्वही रद्द करण्यात येईल, असा कायदा करणार असल्याचे सांगितले. त्याच्याविरोधात सीमाभागात संतापाची लाट उसळली होती. त्या संतापाचा आज सीमाभागासह ठिकठिकाणी उद्रेक झाला.

फोटो- चंद्रकांत पालकर
फोटो- चंद्रकांत पालकर

‘जय महाराष्ट्र’ला विरोध करणाऱया कानडी सरकारला धडा शिकविण्यासाठी शिवसैनिकांनी गडहिंग्लज बसस्थानकामध्ये येणाऱया कानडी बस रोखून काचांवर ‘जय महाराष्ट्र’ लिहिलेले पोस्टर चिकटविले. तसेच बसेसवर ऑइलपेंटने ‘जय महाराष्ट्र’ रंगविले. जिल्हाप्रमुख विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात प्रभाकर खांडेकर, तालुकाप्रमुख दिलीप माने, प्रा. सुनील शिंत्रे, महादेव गावडे, चंदू भोसले, संजय पाटील, वसंत नाईक, अवधूत पाटील, प्रतीक क्षीरसागर यांच्यासह शिवसैनिक मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. गडहिंग्लजप्रमाणे कोल्हापूर आणि सांगलीतही कानडी सरकारविरोधात संताप व्यक्त करण्यात आला. यावेळी मंत्री बेग यांनी मराठी जनतेची माफी मागावी; अन्यथा पुढील परिणामांना बेग जबाबदार असतील, असा इशारा शिवसैनिकांनी दिला.

कर्नाटकचे नगरकिकासमंत्री रोशन बेग यांच्या महाराष्ट्रद्वेषी वक्तव्याचे पडसाद पुण्यातही उमटले. पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात शिवसैनिक व युवा सैनिकांनी आंदोलन केले. कर्नाटक परिवहन मंडळाच्या बसेसवर भगव्या रंगाने ‘जय महाराष्ट्र’ लिहून दणका दिला. पुण्यात महापालिकेतील शिवसेनेचे गटनेते संजय भोसले, नगरसेकक किशाल धनकडे, युका सेनेचे शहराधिकारी किरण साळी, महापालिकेचे माजी गटनेते अशोक हरणाकळ यांच्या नेतृत्काखाली हे आंदोलन करण्यात आले. ‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘शिवसेना झिंदाबाद’ घोषणांनी शिवसैनिकांनी सर्व परिसर दणाणून सोडला. विभागप्रमुख संजय वाल्हेकर, आनंद वाघमारे, राहुल केवटे, आकाश शिंदे, सुनील दारवटकर, सुशील परदेशी, बबलू पवार, मंदार पेठकर यांच्यासह अनेक शिवसैनिक यामध्ये सहभागी झाले होते.

पुण्यात आंदोलन

कर्नाटकचे नगरकिकासमंत्री रोशन बेग यांच्या महाराष्ट्रद्वेषी वक्तव्याचे पडसाद पुण्यातही उमटले. पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात शिवसैनिक व युवा सैनिकांनी आंदोलन केले. कर्नाटक परिवहन महामंडळाच्या बसेसवर भगव्या रंगाने ‘जय महाराष्ट्र’ लिहून दणका दिला.