‘ह.म.बने तु.म.बने’मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद

सामना ऑनलाईन । मुंबई

आजी आजोबा, आई बाबा, काका काकी, मुलं असं एकत्र कुटुंब हसत खेळत एकत्र राहताना बघायला सगळ्यांनाच आवडत. प्रेक्षकांचा हाच आवडीचा विषय घेऊन आलेल्या सोनी मराठी वाहिनीवरील ‘ह.म.बने तु.म.बने’ ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. सोशल मीडियावर देखील या मालिकेबद्दल चांगले रिव्ह्यू वाचायला मिळत आहेत. आलेल्या प्रेक्षकांच्या प्रतिसादावरून लक्षात येते.

दोन बायका एकत्र आल्या की त्यांच्यात वाद हे होतातच, असं बोललं जातं. परंतु सोनी मराठीने ‘ह.म.बने तु.म.बने या मालिकेद्वारे एक नाही, दोन नाही तर तीन-तीन स्त्रियांना एकत्र आणलं आहे. या मालिकेत रोजच्या जगण्यातलं नाट्य हलक्या फुलक्या नर्मविनोदी शैलीत मांडलं आहे.

आदिती सारंगधर, राणी गुणाजी, प्रदीप वेलणकर, उज्वला जोग, सचिन देशपांडे, अजिंक्य जोशी हे कलाकार या मालिकेत मुख्य भूमिकेत आहेत. ही मालिका दर सोमवार ते शनिवार रात्री 10 वाजता सोनी मराठीवर प्रसारित होते.